लंडन: ENG vs IND यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला (second Test Match) सुरुवात होत आहे. परंतु इंग्लंडसाठी (England) आज आणखीन एक वाईट बातमी (bad news) समोर येत आहे. स्टुअर्ट ब्रॉडनंतर आता इंग्लंडचा हुकमी गोलंदाज जेम्स अँडरसन (Bowler James Anderson) देखील जायबंदी झाल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंग्लंडच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.
जेम्स अँडरसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे हैराण आहे. यामुळेच लॉर्ड्सवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणे कठीण दिसत आहे. परंतु अँडरसनच्या न खेळण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही.
यापूर्वी इंग्लंडने त्यांचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला संघात परत बोलावले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस पावसामुळे धुऊन गेल्यानंतर सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने मोईनला संघात बोलावून फलंदाजी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणाला, लॉर्ड्सवर कसोटी सामना होत असल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड उजव्या पोटरीला दुखापत झाल्याने तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. असे त्याने सांगितले.
यावेळी बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, आम्ही चार वेगवान गोलंदाज किंवा चौथ गोलंदाजात फलंदाजीची क्षमता असणारा असे खेळवू शकतो. शार्दुलमध्ये ही क्षमता होती, परंतु त्याच्या डाव्या हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आहे. तिसऱ्या कसोटीपर्यंत तो बरा होईल. दुसऱ्या कसोटीत खेळत नाही.
रवींद्र जडेजाबाबत विराट म्हणाला, जडेजाने धावा केल्या आहेत. त्याने आमची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे.
खेळपट्टी कशी असेल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. लॉर्ड्सचे मैदान क्रिकेट इतिहासातील सर्वात जुने मैदान आहे. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. येथे वेगवान गोलंदाजांना भरपूर स्विंग आणि वेग मिळणे अपेक्षित आहे. जसे दिवस पुढे जातील तसे खेळपट्टीवर फलंदाजी करणे थोडे कठीण होईल. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य निर्णय राहील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.