ENG vs IND: दुसऱ्या कसोटी सामन्यावर देखील पावसाचे ढग

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी झाला असून तो दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी कोणाला संधी मिळेते ते पाहणे औत्सुक्याचे आहे. नॉटिंगहॅम कसोटीत संथ ओव्हर-रेटसाठी इंग्लंड आणि भारताला या दोन्ही संघांना आयसीसीकडून दंड
 सामन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.
सामन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

नॉटिंगहॅम कसोटीत संथ ओव्हर-रेटसाठी (For slow over-rates) इंग्लंड आणि भारताला (England and India) या दोन्ही संघांना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 (WTC) मधील प्रत्येकी दोन गुणांचा दंड आणि करण्यात आला आहे. आयसीसी ट्विटकरत याबाबत माहिती दिली आहे.

शार्दुल ठाकूर जखमी दुसऱ्या सामन्याला मुकणार

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (12 ऑगस्ट) लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येणार आहे. नॉटिंगहॅममध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. शार्दुल ठाकूर जखमी झाला असून तो दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी कोणाला संधी मिळेते ते पाहणे औत्सुक्याचे आहे. शार्दुल ठाकुरच्या जागी रविचंद्रन अश्विन किंवा इशांत शर्माला संघात जागा मिळू शकते.

इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या खेळण्यावर प्रश्चचिन्ह

तर दुसरीकडे इंग्लंडच्या गोटातून देखील वाईट बातमी समोर आली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड नेटमध्ये सराव करत असताना जखमी झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

 सामन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.
ENG vs IND: लॉर्डस् टेस्टसाठी इंग्लंडचा हुकमी एक्का येणार ?

दुसऱ्या कसोटी सामन्यावर देखील पावसाचे ढग

भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये देखील पावसाच्या व्यत्ययाची शक्याता (Chance of rain disruption) वर्तविण्यात आली आहे. लॉर्ड्सच्या मैदानात देखील पावसाचे ढग (Rain clouds) गडद असतील. सामन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी अधूनमधून पाऊस देखील येऊ शकतो. असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com