Hardik Pandya | Rohit Sharma | Live Cricket Update  Dainik Gomantak
क्रीडा

Video: हार्दिकने नेमकी कुणाला दिली शिवी? रोहित शर्मा की विराट कोहली?

सध्या पांड्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या व्हायरल व्हिडिओमागचे काय सत्य आहे?

दैनिक गोमन्तक

ENG vs IND 2nd t20: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा आक्रमक क्रिकेटर मानला जातो. जेव्हा तो लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजाळा दमवून सोडतो. एवढेच नाही गोलंदाजीवरही अप्रतिम कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. सध्या पांड्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या व्हायरल व्हिडिओचा हवाला देत असा दावा केला जात आहे की त्याने मधल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला शिवीगाळ केली. या घटनेची पुष्टी झालेली नाही मात्र व्हिडिओ सतत शेअर केला जात आहे. (Hardik Pandya Abuse Rohit Sharma)

व्हिडिओ शेअर करताना असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा हार्दिक पंड्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात (IND vs ENG 2nd T20I) गोलंदाजी करत होता तेव्हा त्याने गैरवर्तन केले. हार्दिकने रोहितला शिवीगाळ केल्याचे या व्हिडिओमध्ये म्हटले जात आहे. असे असले तरी या व्हिडिओमध्ये आवाजाने पुष्टी झाली नाही. मागून एक आवाज येत आहे ज्यात आक्षेपार्ह शब्द वापरले गेले आहेत. (Live Cricket Update)

हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असताना विराट कोहली सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना नाचू लागला , असा दावा एका यूजरने केला आहे . एजबॅस्टन स्टेडियमवर बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने तो नाचतानाही दिसला. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या व्हिडिओवर अनेक लोकं कमेंन्ट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की हार्दिकने कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) शिवीगाळ केली. तर दुसरीकडे अंकुर नावाच्या युजरने असा दावा केला आहे की, या अष्टपैलूने विराटला शिवीगाळ केली. मात्र या घटनेची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.

दरम्यान, मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळाली. तिसऱ्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या यांच्या जागी रवी बिश्नोई, आवेश खान, उमरान मलिक आणि श्रेयस अय्यर या तरुणांना संधी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT