END vs IND: Weather update about fourth test match  Dainik Gomantak
क्रीडा

END vs IND: चौथ्या कसोटीला आजपासून सुरुवात, असे असेल ओव्हलमध्ये हवामान

भारत विरुध्द इंग्लंड (END vs IND) यांच्यात चौथ्या कसोटीला (Fourth Test) आजपासून ओव्हलवर (Oval) सुरुवात होत आहे.

दैनिक गोमन्तक

भारत विरुध्द इंग्लंड (END vs IND) यांच्यात चौथ्या कसोटीला (Fourth Test) आजपासून ओव्हलवर (Oval) सुरुवात होत आहे. तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला डावाच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे मालिकेत आता 1-1 अशी बरोबरीत झाली आहे. जर टीम इंडियाने (Team India) चौथा कसोटी सामना जिंकला तर भारतीय संघाला इतिहास घडविण्याच्या एक पाऊल दूर असेल. परंतु ओव्हल मैदानावरील इतिहास हा भारताच्या विरोधात आहे. भारताला चौथ्या कसोटीत पराभवाला समोरे जावे लागले तर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका (India-England Test Series) जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहू शकते. त्यामुळे आता दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा असणार आहे . (END vs IND: Weather update about fourth test match)

कसे असेल ओव्हलचे हवामान

ओव्हलमध्ये पहिल्या दिवशी सकाळी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र दुपारनंतर ऊन पडू शकेल. याचे विकेट फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने इथे फलंदाजी करणे सोपे असेल. मात्र पहिल्या दिवशी सकाळी ढगाळ वातावरणामुळे गोलंदाजांनी अनुकून असेल. त्यामुळे हेडिंग्लेची पहिल्या डावाची काहाणी ओव्हलवर देखील रिपिट होऊ शकते. म्हणून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातील बचावात्मक खेळ करुन पहिला कही तास काढणे गरजेचे आहे. पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रापसून फलंदाजी करणे सोपे होऊ शकते. कारण पहिले दोन दिवस पावसाची शक्यता देखील नाही.

जर टीम इंडियानं आज सुरू होणारी ओव्हल टेस्ट गमावली तर 2007 नंतर भारताचं इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याचं स्वप्न अपूर्णच राहणार आहे . अनेक दिवसांपासून भारत ओव्हलच्या मैदानावर टेस्ट जिंकू शकला नाही आणि या वेळेसही हवामानामुळे सामन्यावर परिणाम होईल असे दिसत आहे. कारण इंग्लंडमधील हवामान हे लहरी असून ते कधी बदलते याचा पत्ताही लागत नाही.

इंग्लंडच्या 'क्यूवेदर डॉट कॉम' या वेबसाईटनुसार ओव्हल टेस्टच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीचे काही तास ढगाळ वातावरण असणार हवे . मात्र दुपारनंतर ऊन पडेल. ओव्हलचं पिच हे बॅटींगसाठी अनुकूल आहे. त्यामुळे खेळाडूंना इथं बॅटींग करताना फार त्रास होणार नाही.पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यानं सुरुवातीचे काही तास फास्ट बॉलर्सना मदत मिळण्याचा अंदाज आहे. पण, पहिले दोन दिवस पावासाची शक्यता जवळपास नाही, ही चांगली बातमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT