शेन वॉर्नच्या ऑल टाइम टॉप 10 वेगवान गोलंदाजामध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही

वॉर्नने या यादीत भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या जेम्स अँडरसनलाही (James Anderson) स्थान दिले आहे.
Shane Warne
Shane WarneDainik Gomantak
Published on
Updated on

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने (Shane Warne) आतापर्यंतच्या सर्वोत्तम 10 वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. वास्तविक दोन दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर वॉर्नकडून त्याच्या आवडत्या वेगवान गोलंदाजांची नावे विचारली होती. वॉर्नने त्याच्या टॉप 10 च्या यादीत वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, डेल स्टेन (Dale Steyn) सारख्या महान गोलंदाजांना स्थान दिले आहे. वॉर्नने या यादीत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला स्थान दिलेले नाही. वॉर्नने या यादीत भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या जेम्स अँडरसनलाही (James Anderson) स्थान दिले आहे.

शेन वॉर्नने डेनिस लिली, वसीम अक्रम, माल्कम मोर्शॉल, ग्लेन मॅकग्रा (Glenn McGraw), कर्टली एम्ब्रोस, डेल स्टेन, रिचर्ड हॅडली, जेफ थॉमसन, मायकेल होल्डिंग आणि जेम्स अँडरसन यांना आपल्या यादीत समाविष्ट केले आहे. वॉर्नने आपल्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे ते स्पष्ट केले नसले तरी. वॉर्नच्या या यादीवर त्याचे स्वतःचे माजी सहकारी, मार्क वॉ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मार्क वॉने वॉर्नला सांगितले की, अँडरसन ऐवजी जोएल गॉर्नरला या यादीत समाविष्ट करावे.

Shane Warne
ICC Test Rankings: जो रुट बनला जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज

वॉर्नच्या यादीत समाविष्ट असलेल्या वेगवान गोलंदाजांमध्ये डेल स्टेनचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये 42.3 च्या स्ट्राईक रेटने विकेट्स घेतल्या आहेत. 300 पेक्षा जास्त कसोटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये डेल स्टेनचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. डेल स्टेनने दक्षिण आफ्रिकेसाठी 93 कसोटीमध्ये 439 बळी घेत अतुलनीय कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Shane Warne
ICC Test Rankings : जो रूटची तिसऱ्या स्थानी झेप; तर कोहलीची घसरण 

त्याचबरोबर जेम्स अँडरसन हा या यादीतील एकमेव गोलंदाज आहे जो अजूनही कसोटी क्रिकेट खेळत आहे. 39 वर्षीय अँडरसनने आतापर्यंत 165 कसोटी सामन्यांमध्ये 630 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्यामध्ये अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ मुथय्या मुरलीधरन (800) आणि वॉर्न (708) त्याच्या पुढे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com