James Anderson - Stuart Broad Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: अँडरसनसाठी 41 वा वाढदिवस इमोशनल, जिगरी दोस्त ब्रॉडची सुटणार साथ

James Anderson - Stuart Broad: जेम्स अँडरसन रविवारी त्याचा वाढदिवस 41 वा वाढदिवस साजरा करत आहे, पण त्याच्यासाठी यंदाचा वाढदिवस भावनिकही असणार आहे.

Pranali Kodre

James Anderson - Stuart Broad, Successful Bowling Pair in Test: इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने शनिवारी (29 जुलै) अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सध्या ऍशेस 2023 मालिकेतील द ओव्हल मैदानावर सुरू असलेला पाचवा कसोटी सामना त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार आहे.

ब्रॉडने या सामन्यादरम्यानच निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्यासाठी आणि इंग्लंडसाठी हा सामना अधिक खास असणार आहे. ब्रॉड इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा जेम्स अँडरसननंतरचा दुसराच गोलंदाज आहे.

या ऍशेस कसोटी सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडचा निवृत्तीचा निर्णय सर्वांसमोर आला. दरम्यान, तिसऱ्या दिवसाखेर स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत होते. त्यांची या डावात अखेरची जोडी उरली आहे.

त्यामुळे जेव्हा रविवारी ब्रॉड आणि अँडरसन फलंदाजीला उतरतील, तेव्हा ते अखेरच्यावेळी एकत्र फलंदाजी करताना दिसतील.

क्रिकेटमधील यशस्वी जोडी

ब्रॉड आणि अँडरसन ही इंग्लंडचीच नाही, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांची जोडी आहे. या दोघांनीच 138 कसोटी सामने एकत्र खेळताना 1037 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये अँडरसनने 537 आणि ब्रॉडने 500 विकेट्स घेतल्या आहेत (आकडेवारी 29 जुलै 2023 पर्यंत).

दरम्यान, रविवारी म्हणजेच 30 जुलैला जेम्स अँडरसन त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण, त्याच्यासाठी त्याचा हा वाढदिवस वेगळा असणार आहे. कारण गेल्या 15 वर्षांपासून अँडरसन आणि ब्रॉड यांची जोडगोळी इंग्लंडसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पण आता अँडरसन ब्रॉडबरोबर इंग्लंडकडून अखेरचे किमान दोनच दिवस मैदानावर एकत्र खेळू शकणार आहे.

तसेच जर रविवारी सध्या सुरु असलेला ऍशेस सामना चौथ्याच दिवशी संपला, तर अँडरसनच्या वाढदिवशीच ब्रॉडची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपेल. यानंतर या दोघांना एकत्र खेळताना पाहाता येणार नाही.

इंग्लंडचे सामन्याच वर्चस्व

तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 80 षटकात 9 बाद 389 धावा केल्या आहेत. ब्रॉड 2 धावांवर आणि अँडरसन 8 धावांवर नाबाद आहे. पण पहिल्या डावातील 12 धावांच्या पिछाडीमुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात 377 धावांची आघाडी मिळाली आहे.

तथापि, इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत हे निश्चित केले की ऑस्ट्रेलियाला विजयसाठी किमान 377 पेक्षा अधिक धावांचे आव्हान असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT