Team India Dainik Gomantak
क्रीडा

Emerging Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी महामुकाबला, बांगलादेशला नमवून टीम इंडिया फायनलमध्ये!

Team India: कोलंबोमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया कपमध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत दणदणीत विजय नोंदवला. कोलंबोमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव केला.

यासह भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ आता 23 जुलै रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले

बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकात 211 धावा केल्या. यामध्ये कर्णधार यश धुलने 66 धावांची शानदार खेळी खेळली. सलामीवीर अभिषेक शर्माने 34 आणि साई सुदर्शनने 21 धावा केल्या.

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली, पण नंतर गोलंदाजांनी भारतीय संघाला व्यवस्थित सावरले. बांगलादेशची पहिली विकेट 70 धावांवर पडली.

मोहम्मद नईम 38 धावा करुन बाद झाला. तोपर्यंत बांगलादेश मजबूत स्थितीत होता, पण त्यानंतर अशा विकेट पडू लागल्या की एकापाठोपाठ एक फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.

निशांत सिंधूची स्फोटक गोलंदाजी

भारतीय गोलंदाज निशांत सिंधूने विस्फोटक गोलंदाजी करत 8 षटकात 20 धावा देत 5 बळी घेतले. जरी तो हॅट्ट्रिकला मुकला. 32व्या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर एकापाठोपाठ विकेट्स घेतल्या, पण 34व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याला एकही विकेट घेता आली नाही.

मात्र, त्याने दुसऱ्याच चेंडूवर महमुदुल हसनला बाद करुन बांगलादेशच्या कॅम्पमध्ये दहशत निर्माण केली. सिंधूसोबतच मानव सुथारनेही शानदार गोलंदाजी केली. त्याने 8.2 षटकात 32 धावा देत 3 बळी घेतले. युवराज सिंह डोडियाला एक विकेट मिळाली.

भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील विजेतेपदाचा सामना 23 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सुरु होईल. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत पाहणे रंजक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT