Ellyse Perry
Ellyse Perry Dainik Gomantak
क्रीडा

क्रिकेटमधील अप्सरेला पाहून तुम्हीही व्हाल क्लिन बोल्ड!

दैनिक गोमन्तक

क्रिकेट (Cricket) म्हटलं आपल्या बुध्दीच्या एका कोनातून हा फक्त पुरुषांनी खेळण्याचा खेळ आहे असं सहज येऊन जातो. मात्र पुरुषांबरोबर यामध्ये महिलाही आपली छाप पाडत आहेत. महिला क्रिकेटमध्ये अशा काही खेळाडू ज्या आपल्या क्रिडा कौशल्याबरोबरच ग्लॅमरस लूकसाठी ओळखल्या जातात. यातच महिला क्रिकेटमध्ये, अॅलिस पॅरीचे (Ellyse Perry) नाव अशा क्रिकेटपटूंपैकी एक आहे, जीने मैदानावर आपल्या विक्रमांना गवसणी घातली. तसेच मैदानाबाहेर तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) या स्टार महिला खेळाडूची जगातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना केली जाते.

एलिस पॅरी अशा काही खेळाडूंपैकी एक आहे, जीने आपल्या कारकिर्दीत क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्हीमध्ये ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक खेळला आहे. तिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी दोन्ही खेळांच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले. 2014 नंतर, तिने फुटबॉल खेळणे सोडले आणि अष्टपैलू म्हणून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

अष्टपैलू खेळाडू म्हणून पॅरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. T20 मध्ये 100 विकेट आणि 1000 धावा करणारी ती पहिली खेळाडू आहे. त्याचबरोबर ती ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी कसोटी खेळी खेळणारी महिला खेळाडू आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेत तिने 213 धावा केल्या होत्या. पॅरीने या डावात 374 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान तिने 27 चौकार आणि 1 षटकार मारला होता.

पॅरी ही ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू आहे. तिन्ही फॉरमॅट्ससह, तिने आतापर्यंत 250 हून अधिक सामने खेळले आहेत. गेल्या महिन्यात भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेदरम्यान तिने आपला 252 वा सामना खेळला आणि हा विक्रम आपल्या नावावर केला. पॅरीने 2007 मध्ये पदार्पण केल्यापासून नऊ कसोटी, 118 एकदिवसीय सामने आणि 126 सामने खेळले आहेत.

पॅरीने नऊ कसोटी सामन्यांमध्ये 693 धावा आणि 33 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 118 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.56 च्या सरासरीने 3135 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, 126 टी-20 मध्ये, तिने 27.84 च्या सरासरीने 1253 धावा केल्या आणि 115 बळी घेतले. स्टार क्रिकेटर एलिस पॅरीने 2015 मध्ये रग्बी खेळाडू मॅट टोमुआशी लग्न केले. मात्र, अवघ्या चार वर्षांतच ते वेगळे झाले. तेव्हापासून पेरी अविवाहित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT