ICC T20 Ranking: बाबर आझम बनला नंबर वन फलंदाज

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वनिंदू हसरंगाच्या (Vanindu Hasaranga) रुपाने नवा नंबर वन गोलंदाजही मिळाला आहे.
Babar Azam
Babar AzamDainik Gomantak

ICC T20 Rankings: UAE मध्ये जाहीर झालेल्या T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) च्या मध्यावर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) T20 क्रमवारी जाहीर केली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या (Pakistan) फलंदाजांची दमदार कामगिरी कायम राहिल्याने ताज्या क्रमवारीत पाकिस्तानच्या फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. याच कारणामुळे पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एक नवा नंबर वन गोलंदाजही मिळाला आला आहे.

बाबर आझमने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नंबर वनचा किताब मिळवला आहे. याशिवाय तो विराट कोहलीला मागे टाकून वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वनिंदू हसरंगाच्या (Vanindu Hasaranga) रुपाने नवा नंबर वन गोलंदाजही मिळाला आहे. श्रीलंकेच्या हसरंगाने दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सीला मागे टाकत पहिल्या क्रमांकाची खुर्ची काबीज केली आहे. त्याचवेळी बाबर आझमने इंग्लंडच्या डेव्हिड मलानकडून (David Malan) नंबर वनची खुर्ची मिळवली आहे.

Babar Azam
...अन् विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ भरकटला

ICC T20 विश्वचषक 2021 च्या मध्यावर, नंबर वन फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू बदलले आहेत. फलंदाजीत बाबर आझमने (834) डेव्हिड मलान (798)ला मागे टाकले आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत तबरेझ शम्सी (770) याला वनिंदू हसरंगा (776) मागे टाकले आहे. याशिवाय अफगाणिस्तानच्या मुहम्मद नबीने (271) अष्टपैलूंच्या क्रमवारीत बांगलादेशच्या शकीब अल हसनला (271) मागे टाकले आहे. शाकिब अल हसन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे IC T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ICC T20 क्रमवारीतील शीर्ष 10 फलंदाज

  • 1. बाबर आझम - 834 गुण

  • 2. डेव्हिड मलान - 798 गुण

  • 3. आरोन फिंच - 733 गुण

  • 4. मुहम्मद रिझवान - 731 गुण

  • 5. विराट कोहली - 714 गुण

  • 6. एडन मार्कराम - 712 गुण

  • 7. डेव्हॉन कॉनवे - 698 गुण

  • 8. लोकेश राहुल - 678 गुण

  • 9. जॉस बटलर - 670 गुण

  • 10. एविन लुईस - 665 गुण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com