Dutee Chand Dainik Gomantak
क्रीडा

Dutee Chand Ban: '...पण तुमच्या चूका दिसतात', चार वर्षांच्या बंदीनंतर द्युती चंदची भावूक पोस्ट

Dutee Chand Post: डोपिंग प्रकरणामुळे 4 वर्षांची बंदी आल्यानंतर द्युती चंदने केलेली भावुक पोस्ट चर्चेत आली आहे.

Pranali Kodre

Dutee Chand social media post after four-year dope ban:

भारताची पदक विजेती धावपटू द्युती चंद हिच्यावर डोपिंग प्रकरणात अडकल्याने 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तिच्यावर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीकडून (NADA) ही बंदी घालण्यात आली आहे. पण तिने या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, तिने जरी अपील केले, तरी ती निर्दोष मुक्त होईपर्यंत तिच्यावरील ३ जानेवारीपासून लागलेली तात्काळ बंदी कायम राहणार आहे. ही धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर द्युतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ज्याची बरीच चर्चा होत आहे. तिच्या पोस्टवर तिने ओडिया भाषेत कॅप्शन लिहिले आहे.

27 वर्षीय द्युतीने बीएमडब्लू कारजवळ उभा राहिलेला तिचा फोटो शेअर केला असून त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'तुमचे अश्रू कोणीही लक्षात घेणार नाही. तुमचे दु:ख कोणालाही जाणवणार नाही, पण तुमच्या चुका सर्वांना दिसतात.'

द्युतीवर बंदी

भारताची एशियन गेम्समध्ये दोन पदके जिंकणाऱ्या द्युतीच्या नावावर 100 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम आहे. पण गेल्यावर्षी 5 आणि 26 डिसेंबर 2022 नाडाने घेतलेल्या दोन सँम्पलमध्ये वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीकडून (WADA) प्रतिबंध असलेले पदार्थ आढळले आहेत. त्याचमुळे तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

या बंदीविरुद्ध अपील करण्यासाठी तिच्याकडे २१ दिवसांचा कालावधी आहे. तिचे वकील पार्थ गोस्वामी यांनी म्हटले आहे की तिने नकळत अशा पदार्थांचे सेवन केले आहे.

तसेच त्यांनी म्हटले आहे की अँटी डोपिंग डिसिप्लिनरी पॅनलसमोर (एडीडीपी) तिने या पदार्थांच्या सेवनाचे स्त्रोत काय होते, याबद्दल माहिती दिली आहे. हे पदार्थ कोणत्याही प्रकारे खेळात फायदा घेण्यासाठी वापरले नव्हते.

कर्करोगावरील औषधे पडली महागात

रिपोर्ट्सनुसार तिने तिच्या फिजिओथेरेपिस्टशी सल्लामसलत केल्यानंतर औषध घेतले होते. ज्यांचा सल्ला ती 2012 पासून घेत असून ते हैदराबादमधील पुलेला गोपिचंद अकादमीमध्ये काम पाहातात. तिने त्यांच्याशी झालेल्या संवादाचे स्क्रिनशॉट देखील सादर केले आहेत.

तथापि, 2021 मध्ये तिच्या पोटाच्या खाली पहिल्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले होते. ज्यात तिला खूप वेदना झाल्या होत्या. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने वेदना कमी झाल्यानंतर कोणतीही तपासणी केलेली नाही, तसेच तिने औषध घेतले नाही.

दरम्यान, द्युतीने असे म्हटले आहे की तिने कर्करोगाच्या निदानानंतर वेदना कमी करण्यासाठी घेतलेल्या औषधांमध्ये जी औषधे घेतली होती, त्यात प्रतिबंधीत पदार्थांचाही समावेश होता, हे माहित नव्हते.

द्युतीने 2018 साली झालेल्या एशियन गेम्समध्ये 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. आता ती सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 स्पर्धेला मुकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT