Durand Cup : Devendra Murgaonkar (right) and FC Goa players cheering after scoring a goal.
Durand Cup : Devendra Murgaonkar (right) and FC Goa players cheering after scoring a goal. Dainik Gomantak
क्रीडा

Durand Cup : एफसी गोवाचा ‘ऑल विन’ धडाका

दैनिक गोमंतक

पणजीः आघाडीपटू देवेंद्र मुरगावकर आणि मुहम्मद नेमिल यांच्या प्रत्येक दोन गोलच्या बळावर एफसी गोवा (FC Goa) संघाने 130व्या ड्युरँड कप फुटबॉल (Durand Cup Football) स्पर्धेत ऑल विन धडाका राखला. जमशेदपूर एफसी (Jamshedpur FC) संघाला 5-0 फरकाने धुव्वा उडवून त्यांनी ब गटातील तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान राखले. कोलकाता येथील विवेकानंद युबा भारती क्रीडांगणावर शुक्रवारी झालेल्या लढतीत देवेंद्रने अनुक्रमे 20 व 44व्या मिनिटास गोल केला. याशिवाय प्रिन्सटन रिबेलो याने 26व्या मिनिटास गोल केला. त्यामुळे पूर्वार्धात हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघ तीन गोलने आघाडीवर होता. एकोणीस वर्षीय मुहम्मद नेमिल याने अनुक्रमे 46 व 81व्या मिनिटास गोल करून एफसी गोवाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नेमिलने दुसरा गोल लांबवरून नोंदविताना लाँग रेंजर कसब प्रदर्शित केले. एफसी गोवाने नऊ गुणांसह ब गटात प्रथम स्थान मिळविले. त्यांनी अगोदरच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे जमशेदपूर एफसीचे आव्हान साखळी फेरीतच आटोपले. गटातील अन्य एका लढतीत 2016 मधील विजेत्या आर्मी ग्रीन संघाने सुदेवा दिल्ली एफसीवर 1-0 फरकाने मात केली. आर्मी संघाचे सहा गुण झाले, त्यामुळे त्यांनाही बाद फेरीत जागा मिळाली.

नवोदितांना संधी
प्रशिक्षक फेरांडो यांनी आज नवोदितांना संधी दिली. गोलरक्षक ह्रतीक तिवारी याला फर्स्ट स्टार्ट मिळाला. ह्रतीकने आता एफसी गोवाच्या 18 वर्षांखालील, डेव्हलपमेंटल, तसेच सीनियर संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे. ब्रँडन फर्नांडिसने संघाचे नेतृत्व केले. आल्बर्टो नोगेरा हा संघातील एकमेव परदेशी खेळाडू होता.
दृष्टिक्षेपात...
- देवेंद्र मुरगावकर व मुहम्मद नेमिल यांचे स्पर्धेत प्रत्येकी 3 गोल
- प्रिन्सटन रिबेलोचा एफसी गोवा सीनियर संघासाठी पहिलाच गोल
- बाद फेरीत 23 सप्टेंबर रोजी एफसी गोवाची गट ‘क’ उपविजेत्याशी लढत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT