Duleep Trophy 2023 | South Zone vs North Zone Twitter/AshwinAchal
क्रीडा

Duleep Trophy मध्येही खिलाडूवृत्तीच्या चर्चेला उधाण; पण कर्णधारानंच केली विरोधी टीमची पाठराखण

Duleep Trophy: दुलीप ट्रॉफीमध्ये दक्षिण आणि उत्तर या विभागीय संघात झालेल्या उपांत्य सामन्यानंतर खिलाडूवृत्तीच्या चर्चेला उधाण आले.

Pranali Kodre

Duleep Trophy 2023, South Zone vs North Zone: क्रिकेटविश्वात गेल्या काही दिवसांपासून खिलाडूवृत्तीबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. आता भारतात सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेदरम्यानही खेळभावना चर्चेत आली आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरीत दक्षिण विभागाने उत्तर विभागाला रोमांचक सामन्यात 2 विकेट्स ने पराभूत केले आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.

मात्र, या सामन्यात अखेरच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (8 जुलै) उत्तर विभागाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उभे करण्यात आले. झाले असे की या सामन्यात दक्षिण विभागाला विजयासाठी 215 धावांचे आव्हान होते. पण अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ सुरु होण्यासाठी उशीर झाला होता.

तसेच जर सामना अनिर्णित राहिला असता, तर उत्तर विभागाने अंतिम सामन्यात प्रवेश केला असता, कारण उत्तर विभागाने 3 धावांनी आघाडी मिळवलेली होती. त्यामुळे नियमानुसार सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावात आघाडी मिळवलेल्या संघाला पुढच्या फेरीत जाता येते.

रिपोर्ट्सनुसार याच नियमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न उत्तर विभागाचा होता. त्यांनी अखेरच्या दिवशी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सामना अनिर्णित राहिल. उत्तर विभागाने अखेरची 5.5 षटके गोलंदाजी करण्यासाठी तब्बल 53 मिनिटे घालवले होते.

मात्र, उत्तर विभागाची ही चाल आर साई किशोरच्या फलंदाजीने फोल ठरवली. त्याने अखेरीस 2 षटकारांसह 15 धावा करत दक्षिण विभागाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मात्र, या सामन्यानंतर उत्तर विभागाच्या खिलाडूवृत्तीवर टीका केली जात आहे.

तथापि, दक्षिण विभागाचा कर्णधार हनुमा विहारीने मात्र, उत्तर विभागाची पाठराखण केली आहे.

त्याने स्पोर्टस्टारशी बोलताना म्हटले की 'मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरेच सामने पाहिले आहे की संघ अखेरच्या सत्रात षटकांची गती कमी करतात. हे त्यांच्या बाजूने विचार केल्यास चूकीचे नसते. कदाचीत काहीजण म्हणतील की हे खेळभावनेच्या विरुद्ध आहे. पण मी जर उत्तर विभागाचा कर्णधार असतो, तर मी देखील असेच केले असते.'

सामन्याचा थोडक्यात आढावा

या सामन्यात उत्तर विभागाने पहिल्या डावात 58.3 षटकात सर्वबाद 198 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण विभागाने 54.4 षटकात सर्वबाद 195 धावा केल्या. त्यामुळे उत्तर विभागाला 3 धावांची आघाडी मिळाली होती.

उत्तर विभागाने दुसऱ्या डावात 56.4 षटकात सर्वबाद 211 धावा केल्या. त्यामुळे त्यांना दक्षिण विभागासमोर पहिल्या डावातील 3 धावांच्या आघाडीवर 215 धावांचेच आव्हान ठेवता आले. हे आव्हान दक्षिण विभागाने अखेरच्या दिवशी 8 विकेट्स गमावत 219 धावा करत सहज पूर्ण केले. त्यामुळे दक्षिण विभागाने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT