Duleep Trophy 2023
Duleep Trophy 2023Dainik Gomantak

Duleep Trophy 2023: 'या' दोन संघांनी मिळवलं फायनलचं तिकीट! केव्हा अन् कुठे रंगणार अंतिम मुकाबला?

Duleep Trophy Final: दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धाच्या अंतिम सामन्यात पोचणारे दोन संघ निश्चित झाले आहेत.
Published on

Duleep Trophy 2023 Final: भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटच्या 2023-24 हंगामाला सुरुवात झाली आहे. सध्या दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, विभागीय संघ पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या या दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचणारे दोन संघ मिळाले आहेत.

अंतिम सामन्यात पश्चिम विभाग आणि दक्षिण विभागाने स्थान मिळवले आहे. आता यांच्यातील अंतिम सामना बंगळुरूला 12 जुलैपासून खेळवला जाणार आहे. हा सामना पाच दिवसांचा अंतिम सामना असेल.

Duleep Trophy 2023
Cheteshwar Pujara: टीम इंडियातून डच्चू, पुजाराने खणखणीत शतकासह दिलं उत्तर; सचिन-गावसकरांच्या पंक्तीतही मिळवलं स्थान

5 ते 8 जुलैदरम्यान झालेल्या उपांत्य फेरीतील पहिला सामना पश्चिम विभाग आणि मध्य विभाग संघात पार पडला. या सामन्यात पावसाने मोठा अडथळा आणला होता. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. पण पहिल्या डावातील आघाडीमुळे पश्चिम विभागाने अंतिम सामन्याचे तिकिट मिळवले.

या सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या डावात 92.5 षटकात सर्वबाद 220 धावा केल्या होत्या. तसेच मध्य विभागाने पहिल्या डावात सर्वबाद केवळ 128 धावा केल्या. त्यामुळे पश्चिम विभागाने 92 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात पश्चिम विभागाने 93.2 षटकात सर्वबाद 297 धावा केल्या. तसेच मध्य विभाग दुसऱ्या डावात 4 बाद 128 धावांवर खेळत असताना सामना थांबला.

Duleep Trophy 2023
Duleep Trophy: धोनीचा हुकमी एक्का खेळणार वेस्ट झोनकडून, 'या' खेळाडूची घेणार जागा

दरम्यान उत्तर विभाग आणि दक्षिण विभागातील दुसरा उपांत्य सामना रोमांचक झाला. या सामन्यात उत्तर विभागाने पहिल्या डावात 58.3 षटकात सर्वबाद 198 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण विभागाने 54.4 षटकात सर्वबाद 195 धावा केल्या. त्यामुळे उत्तर विभागाला 3 धावांची आघाडी मिळाली.

उत्तर विभागाने दुसऱ्या डावात 56.4 षटकात सर्वबाद 211 धावा केल्या. त्यामुळे त्यांना दक्षिण विभागासमोर पहिल्या डावातील 3 धावांच्या आघाडीवर 215 धावांचेच आव्हान ठेवता आले. हे आव्हान दक्षिण विभागाने अखेरच्या दिवशी 8 विकेट्स गमावत 219 धावा करत सहज पूर्ण केले. त्यामुळे दक्षिण विभागाने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com