वृद्धिमान साहाचं मोठं मन! Duleep Trophy मध्ये संधी असूनही 'या' कारणामुळे दिला खेळण्यासाठी नकार

वृद्धिमान साहाने आगामी दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेत खेळण्यासाठी नकार दिला आहे.
Wriddhiman Saha
Wriddhiman SahaTwitter
Published on
Updated on

Wriddhiman Saha declined to be a part of East Zone squad for Duleep Trophy 2023: भारतातील 2023-24 देशांतर्गत क्रिकेट हंगामालाची सुरुवात 28 जूनपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेने होणार आहे. विभागीय संघ पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आता संघांची निवड केली जात आहे. नुकतीच पूर्व विभागाच्या संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.

पण या संघाकडून खेळण्यासाठी 38 वर्षीय वृद्धिमान साहाने नकार दिला. पण त्याच्या नकारामागे दिलेल्या कारणाने त्याचे सध्या कौतुक होत आहे.

पूर्व विभागीय निवड समितीने संघात यष्टीरक्षक म्हणून आधी ईशान किशनला संधी देण्याचा विचार केला होता. मात्र, त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा पर्याय वृद्धिमान साहाचा होता.

साहा बंगाल संघातून बाहेर पडल्यानंतर आता त्रिपूराकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याला पूर्व विभागाकडून खेळण्यासाठी त्रिपूराचे निवडकर्ते जयंत डे यांनी संपर्क साधला. पण साहाने खेळण्यासाठी नकार दिला. यासाठी त्याने युवा खेळाडूला संधी मिळावी या हेतूने खेळण्यासाठी नकार दिला.

Wriddhiman Saha
Duleep Trophy: दक्षिण विभागात निवड झालेल्या गोव्याच्या एकमेव खेळाडूबद्दल माहिती आहे का?

जयंत डे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की साहा म्हणाला, दुलीप ट्रॉफी भारतीय संघातील संधीसाठी महत्त्वाची आहे. जर मी भारताकडून पुन्हा खेळू शकणार नसेल, तर एखाद्या युवा खेळाडूसाठी मार्ग मोकळा करणे योग्य आहे.

म्हणूनच तिसरा पर्याय म्हणून अभिषेक पोरेलची निवड करण्यात आली. साहा भारताकडून अखेरचे डिसेंबर 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही.

दरम्यान, 20 वर्षीय अभिषेक बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने मागील देशांतर्गत हंगामात बंगालकडून फलंदाजी आणि यष्टीरक्षक म्हणून चांगली कमगिरी केली होती. तसेच तो आयपीएल 2023 मध्येही दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्याला मिळालेल्या संधीत फलंदाजीत कमाल दाखवता आली नसली, तरी त्याने यष्टीरक्षण कौशल्याने अनेकांना प्रभावित केले होते.

Wriddhiman Saha
BCCI ची मोठी घोषणा! 2023-24 डोमेस्टिक क्रिकेट हंगामात होणार तब्बल 1846 सामने, पाहा टाईमटेबल

तसेच, पूर्व विभाग संघात पोरेलशिवाय 19 वर्षांखालील भारतीय संघाचा भाग असलेला 18 वर्षीय के कुशाग्र हा देखील यष्टीरक्षक म्हणून पर्याय आहे. तसेच या संघाचे कर्णधारपद अनुभवी अभिमन्यू ईश्वरनकडे देण्यात आले आहे. तसेच शाहबाज नदीमकडे उपकर्णधारपद सोपवले आहे. या संघात रियान परागलाही संधी मिळाली आहे.

दुलीप ट्रॉफी 2023 साठी पूर्व विभाग संघ

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), शांतनू मिश्रा, सुदीप घरामी, रियान पराग, एम मजूमदार, बिपीन सौरभ, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), के कुशाग्र (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम (उपकर्णधार), शाहबाज अहमद, मुकेश कुमार, आकाश दीप, अनुकूल रॉय, एम मुरा सिंग, इशान पोरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com