Suyash prabhudesai Dainik Gomantak
क्रीडा

Duleep Trophy : गोव्याचा सुयश प्रभुदेसाई दक्षिण विभाग संघात

उद्यापासून बंगळूर येथे पश्चिम विभागाविरुद्ध अंतिम सामना

किशोर पेटकर

Duleep Trophy : दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघातील साई सुदर्शन आणि प्रदोष रंजन पॉल यांची उदयोन्मुख खेळाडूंच्या भारत ‘अ’ संघात निवड झाल्यामुळे ते श्रीलंकेत आशियाई करंडक स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत, त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागी गोव्याचा 25 वर्षीय फलंदाज सुयश प्रभुदेसाई व कर्नाटकचा वेगवान गोलंदाज व्ही. कौशिक यांना पंधरा सदस्यीय दक्षिण विभाग संघात संधी मिळाली.

दक्षिण विभाग व पश्चिम विभाग यांच्यातील अंतिम सामना बुधवारपासून (ता. १२) बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. गोव्याचा रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार डावखुरा दर्शन मिसाळ याची यापूर्वीच दक्षिण विभाग संघात निवड झालेली आहे.

आता सुयशला संघात सामावल्यामुळे गोव्यातील खेळाडूंची एकूण संख्या दोन झाली आहे. अगोदर सुयश स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघाच्या राखीव खेळाडूंत होता. गोव्याचे माजी रणजी अष्टपैलू हेमंत आंगले यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण विभाग संघाने उपांत्य लढतीत उत्तर विभाग संघाला दोन विकेट राखून हरविले होते.

दक्षिण विभाग संघासमवेत गोव्याचे जोशुआ तलवार (मसाजर) व उत्कर्ष शिरोडकर (व्यवस्थापक) बंगळूर येथे आहेत.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई यांनी सांगितले, की ‘‘दक्षिण विभागाचे निमंत्रकपद आमच्याकडे आहे. त्याचवेळी संघात दर्शन मिसाळ व सुयश प्रभुदेसाई हे दोघे क्रिकेटपटू, मुख्य प्रशिक्षक हेमंत आंगलेही गोव्याचेच, तसेच मसाजर व व्यवस्थापक मिळून पाच गोमंतकीय यांची निवड होणे ही राज्यातील क्रिकेटसाठी फार मोठी उपलब्धी आहे.’’ ते यंदा दक्षिण विभागाचे निमंत्रक आहेत.

लक्षवेधक सुयश प्रभुदेसाई

  1. गतमोसमात (२०२२-२३) ७ रणजी सामन्यांत एका द्विशतकासह ४७१ धावा

  2. पर्वरी येथे राजस्थानविरुद्ध २१२ धावांची खेळी

  3. एकंदरीत २६ रणजी क्रिकेट सामन्यांत ४२.८६च्या सरासरीने १६२९ धावा, २ शतके व १० अर्धशतके

  4. दुलीप करंडक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय दक्षिण विभाग संघात प्रथमच निवड

  5. २०२२ व २०२३ मधील आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

SCROLL FOR NEXT