Dream 11 Team Dainik Gomantak
क्रीडा

Dream 11 Team: ट्रक ड्रायव्हरला लागली लॉटरी, 49 रुपये गुंतवून बनला 'करोडपती'

Dream 11 Team: कष्टाने पैसा कमावलेल्या लोकांच्या कहाण्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण नशिबाने करोडपती बनणाऱ्यांची कहाणी क्वचितच ऐकायला मिळते.

Manish Jadhav

Truck Driver Wins Dream 11 Team Competition: कष्टाने पैसा कमावलेल्या लोकांच्या कहाण्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण नशिबाने करोडपती बनणाऱ्यांची कहाणी क्वचितच ऐकायला मिळते.

या काही कहाण्यांमध्ये आता एका ट्रक चालकाचे नाव जोडले गेले आहे. येथे आम्ही ट्रकचालक शहाबुद्दीन याच्याबद्दल बोलत आहोत. शहाबुद्दीन रातोरात करोडपती झाला. चला तर मग शहाबुद्दीनची कहाणी सविस्तर जाणून घेऊया...

दरम्यान, ड्रीम इलेव्हन या फॅन्टसी अॅपमुळे शहाबुद्दीनचे नशीब पालटले. शहाबुद्दीनला अजिबात आशा नव्हती की, तो असा करोडपती होईल. ड्रीम इलेव्हनवर एक संघ तयार करुन शहाबुद्दीनने एका रात्रीत दीड कोटी रुपये कमावले.

आता, प्रत्येकजण शहाबुद्दीनबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शहाबुद्दीन काय करतो? शहाबुद्दीन कुठला आहे? शहाबुद्दीनच्या कुटुंबात कोण कोण आहे?

जर तुम्ही या प्रश्नांबद्दल ऑनलाइन सर्च करत असाल तर आम्ही तुम्हाला शहाबुद्दीनबद्दल सविस्तर सांगणार आहोत... शहाबुद्दीन हा मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बरवानी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो व्यवसायाने ट्रक चालक आहे.

दुसरीकडे, त्याने स्वतः ट्रक चालक असल्याचे सांगितले. सध्या तो भाड्याच्या घरात राहतो. त्याच्या स्वप्नाबद्दल विचारले असता त्याने या रकमेतून स्वतःचे घर बांधणार असल्याचे सांगितले. शहाबुद्दीनच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

तसेच, शहाबुद्दीनने कोलकाता आणि पंजाब यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात संघ बनवला आणि तो पहिला राहिला. विजयासह त्याच्या खात्यात दीड कोटी रुपये जमा झाले. शहाबुद्दीन गेली 2 वर्षे यामध्ये आपले नशीब आजमावत होता.

शहाबुद्दीनची टीम: शिखर धवन (Shikhar Dhawan), भानुका राजपक्षे, आर गुरबाज, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सॅम करण, टीम साऊदी आणि राहुल चहर यांच्यासह संघात अर्शदीप कर्णधार, सिकंदर रझा उपकर्णधार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT