Do you know what happened when Virat left the Test captaincy Dainik Gomantak
क्रीडा

विराटनं कसोटीचं कर्णधारपद सोडलं होतं तेव्हा काय झालं होतं तुम्हाला माहितेय का?

विराट कोहलीने नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी कर्णधारपद सोडले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटी मालिका 2-1 अशी गमावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीने नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी कर्णधारपद सोडले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटी मालिका 2-1 अशी गमावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी हरल्यानंतर लगेचच कर्णधारपद सोडण्याबाबत सहकाऱ्यांना सांगितले होते.

आता असे समोर आले आहे की त्याने बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीलाही या निर्णयाची माहिती दिली होती. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर त्याच्यासोबत आलेल्या निवडक अबे कुरुविलाला त्याने याबाबत सांगितले होते. निवडकर्त्यांची इच्छा होती की कोहलीनेच कसोटीत कर्णधारपद कायम राखावे पण ते मान्य झाले नाहीत. विराटने नंतर बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह यांच्याशीही चर्चा केली होती.

द वीक या इंग्रजी मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीने सौरव गांगुलीशी फोनवर चर्चा केली. यामध्ये त्यांनी सांगितले की, सकाळी उठल्यावर आनंद आणि फ्रेश वाटत नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपद सोडायचे आहे. त्याने निवडकर्त्यांनाही हेच सांगितले. त्यानंतर विराट कोहलीने त्याच्या निर्णयाबद्दल ट्विट केले तेव्हा त्यानेही तेच सांगितले होते.

या मुद्द्यावर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत द वीकने लिहिले की, "जेव्हा त्याने टी-20 कर्णधारपद सोडले, तेव्हा बोर्डाने त्याला असे करू नये म्हणून मन वळवण्याचा प्रयत्न केला. आरसीबीला कर्णधारपदावरून हटवण्यात बोर्डाची कोणतीही भूमिका नव्हती. चेतन शर्माने त्याला कसोटी संघाच्या निवडीपूर्वी सकाळी सांगितले की निवडकर्त्यांना पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार नको आहेत. कोहलीने एकदा काही ठरवले की त्याला पटवणे खूप अवघड असते. अनिल कुंबळेची घटना घडली तेव्हाही असेच झाले होते. आताही तेच झाले आहे.

जेव्हा कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला फोन केला. मात्र त्यांच्यात फारसे बोलणे झाले नाही. अशा स्थितीत कोहलीने चेतन शर्माच्या फोनकडे फारसे लक्ष दिले नाही. गेल्या काही महिन्यांपासून कोहलीला असे वाटत होते की बोर्ड आणि निवडकर्ते त्याला साथ देत नाहीत. यामुळेही कोहलीने कर्णधारपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT