IND vs WI: जसप्रीत बुमराह ODI-T20 मालिकेला मुकणार, या गोलंदाजाची सुट्टी निश्चित!

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) निराशाजनक कामगिरीनंतर आता टीम इंडियाला वेस्ट इंडिजशी (IND VS WI) सामना करायचा आहे.
jasprit bumrah
jasprit bumrahDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर आता टीम इंडियाला वेस्ट इंडिजशी (IND VS WI) सामना करायचा आहे. वेस्ट इंडिज संघ 6 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आणि त्यानंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या आठवड्यात या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली जाऊ शकते. मात्र भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती दिली जाऊ शकते, असे वृत्त समोर आले आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर न गेलेला कर्णधार रोहित शर्मा परतणार असून पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून त्याची ही पहिलीच मालिका असेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) आता पूर्णपणे तंदुरुस्त असला तरी तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत होता. (Jaspreet Bumrah Could Be Rested For ODI And T20 Series Against West Indies)

न्यूज 9 च्या बातमीनुसार, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही (Bhuvneshwar Kumar) विश्रांती देण्यात येऊ शकते. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भुवनेश्वरला उत्तम कामगिरी करता आली नव्हती. मोठी बातमी म्हणजे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कदाचित वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दिसणार नाही. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाची शक्यताही नगण्य आहे. हे दोन्ही खेळाडू अजूनही 100 टक्के तंदुरुस्त नाहीत.

jasprit bumrah
IND vs WI: भारत अन् वेस्ट इंडिजच्या ODI-T20 मालिकेतील वेळापत्रकात झाला बदल

मोहम्मद शमी परतणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आलेल्या मोहम्मद शमीला वेस्ट इंडिज मालिकेत संधी मिळू शकते. सूत्रांनी न्यूज 9 ला सांगितले की, “संघ प्रत्येक खेळाडूच्या वर्कलोडवर विशेष लक्ष देत आहे. T20 विश्वचषक आणि IPL जवळ आले आहेत, पुढील काही महिने खेळाडूंसाठी कठीण जाणार आहेत. बुमराहने दक्षिण आफ्रिका मालिकेत सर्वाधिक षटके टाकली आहेत, त्यामुळे शमी संघात परतणार असला तरी त्याला विश्रांती देणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेला वॉशिंग्टन सुंदरही टीम इंडियात परतणार असल्याचे मानले जात आहे. तसेच अक्षर पटेल आता तंदुरुस्त असून त्यालाही संघात संधी मिळू शकते.

jasprit bumrah
IND Vs SA: ऋषभ पंतच्या खराब शॉटवर विराट संतापला, पहा व्हिडीओ

भारत-वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. दुसरा T20 सामना 9 फेब्रुवारीला आणि तिसरा T20 सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. तिन्ही सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. यानंतर 16 फेब्रुवारीपासून टी-20 मालिका सुरु होईल आणि सर्व सामने कोलकातामध्ये खेळवले जातील. वनडे मालिकेतील दुसरा सामना 18 फेब्रुवारीला आणि तिसरा सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com