Dinesh Karthik latest News  Dainik Gomantak
क्रीडा

साहा आणि पंतवर दिनेश कार्तिकचे वक्तव्य; टीम इंडिया कुठे चालली...

दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुनरावलोकनात सांगितले आहे की, पंतने संघात आपले स्थान निश्चित केले.

दैनिक गोमन्तक

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की टीममधून नाकारले जाणे हे प्रत्येकासाठी स्वीकारणे सोपे नसते. मात्र, ऋषभ पंतने (Rishabh Pant) संघात आपले स्थान पक्के केले आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. (Dinesh Karthiks statement about Saha and Pant I can understand where Team India going)

दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुनरावलोकनात सांगितले आहे की, पंतने संघात आपले स्थान निश्चित केले. त्याचबरोबर दुसरा पर्याय म्हणून संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडूंवरती विश्वास व्यक्त केला. अशा स्थितीत टीम इंडिया (Team India) कुठे चालली आहे हे समजू शकते. ते स्पष्टपणे भविष्याकडे पाहत आहे.

कार्तिक म्हणाला की, 'मी साहाची मुलाखत जिथेही पाहिली आहे, मला खात्री आहे की हा निर्णय कुठून आला आहे हे त्यालाही समजले आहे. मला माहीत आहे की, ज्या क्रिकेटपटूला तू सोडून जा असे म्हटल्या नंतर, तो ते स्वीकारू शकणार नाहीये. ते खूप कठीण आहे, कारण आपण दररोज त्याच्याशी जोडले गेलेलो असतो.

आपण देशासाठी खेळावे अशी आपली सर्वांची इच्छा आहे. ही प्रत्येकाची इच्छा असते, तेव्हा कोणी येऊन सांगते की माझ्या मते तुमची वेळ संपली आहे. मग ही गोष्ट पचवने फार कठीण होते. तथापि, हे सर्व अर्थपूर्ण आहे आणि आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की निवडकर्ते, प्रशिक्षक आणि कर्णधार कोणत्या दिशेने जाताना दिसत आहेत.

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) म्हणाला की, साहा हा जगातील सर्वोत्तम विकेटकीपर्स पैकी एक आहे आणि माझाही असाच विश्वास आहे. मात्र, महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने प्रवेश केला होता, त्याच पद्धतीने ऋषभ पंतनेही आपले स्थान निर्माण केले आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि तोही चांगली कामगिरी करत आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऋद्धिमान साहाला भारतीय संघात स्थान मिळालेले नाहीये. यानंतर त्याने खुलासा केला होता की प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) त्याला निवृत्तीचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी संघातील स्थान त्यांच्याच अधिपत्याखाली राहील, असे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या सर्व खुलाशानंतर बीसीसीआयने साहा यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा देखील आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT