Dinesh Karthik | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

Team India: "किमान एशियन गेम्ससाठी तरी 'त्याला' कॅप्टन करा", दिग्गज भारतीय विकेटकिपरची मागणी

Team India: भारताच्या स्टार विकेटकिपरने आगामी एशियन कपमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी अनुभवी खेळाडूचे नाव सुचवले आहे.

Pranali Kodre

Dinesh Karthik on team India's Captain: चीनच्या हांग्जो शहरात यावर्षी एशियन गेम्स स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत यंदा क्रिकेट खेळही खेळवला जाणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत बीसीसीआय महिला आणि पुरुष दोन्ही संघ पाठवणार आहे. याच स्पर्धाच्या दृष्टीने दिनेश कार्तिकने भारतीय संघाच्या कर्णधारपदाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, एशियन गेम्स आणि भारतात होणारा वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या तारखा तारखा एकत्र आल्या आहेत. अशात बीसीसीआय एशियन गेम्ससाठी भारताचा पुरुषांचा अ संघ पाठवण्याची शक्यता आता. तसेच महिलांचा मात्र प्रमुख संघच या स्पर्धेत खेळताना दिसून शकतो.

त्याचमुळे जर बीसीसीसीआ भारतीय पुरुष संघाचा दुसरा संघ एशियन गेम्ससाठी पाठवणार असेल, तर या संघाचा कर्णधारपद कोण निभावणार अशी चर्चा आहे. दरम्यान, नेतृत्वासाठी शिखर धवनचे नाव समोर येत आहे. दरम्यान, दिनेश कार्तिकने या स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधारपदासाठी आर अश्विनचे नाव सुचवले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना कार्तिकने म्हटले आहे की जर आर अश्विन वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघाच्या योजनेत नसेल, तर त्याला एशियन गेम्ससाठी कर्णधारपद दिले जाऊ शकते.

कार्तिक म्हणाला, 'गोलंदाजीची गुणवत्ता आणि विकेट्सची संख्या लक्षात घेता आर अश्विन हा महान खेळाडूंपैकी एक आहे. मला खरंच असं वाटतं की जर भारताचा ब संघ पाठवला जाणार असेल आणि मुख्य संघ वर्ल्डकपची तयारी करत असेल, तसेच अश्विन वर्ल्डकपच्या योजनेत नसेल, तर त्याला कर्णधार करायला हवं. माझी इच्छा आहे की किमान एशियन गेम्ससाठी तरी त्यांनी अश्विनला कर्णधार करावे. हे कर्णधारपद त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा असेल.'

आर अश्विन भारताच्या दिग्गज गोलंदाजांपैकी एक मानला जातो. तो कसोटीत भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तसेच तो सध्या कसोटीतील अव्वल क्रमांकाचा गोलंदाजही आहे.

अश्विनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 92 कसोटीत 474 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 113 वनडेत 151 विकेट्स घेतल्या आहेत, तर 65 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत.

एशियन गेम्समध्ये तिसऱ्यांदा क्रिकेट

खरंतर 19 व्या एशियन गेम्सचे आयोजन गेल्यावर्षी सप्टेंबरदरम्यान होणार होते. पण चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने ही स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आली. एशियन गेम्समध्ये तिसऱ्यांदा क्रिकेटचे आयोजन होणार आहे.

यापूर्वी 2010 आणि 2014 साली एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचे आयोजन झाले होते. 2010 मध्ये बांगलादेशच्या पुरुष संघाने आणि पाकिस्तानच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2014 मध्ये श्रीलंकेच्या पुरुष संघाने आणि पाकिस्तानच्या महिला संघाने सुवर्णपदक पटकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT