Dhoni Entertainment Film
Dhoni Entertainment Film  Dainik Gomantak
क्रीडा

Dhoni Entertainment Film: एमएस धोनी उतरला फिल्म प्रोडक्शनमध्ये, पहिल्या चित्रपटाची घोषणा

Pranali Kodre

Dhoni Entertainment Film: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी फिल्म प्रोडक्शनमध्ये पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले होते. धोनी एंटरटेनमेंट असे फिल्म प्रोडक्शन कंपनीचे नाव आहे. आता धोनी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली नवा चित्रपटचीही निर्मिती करण्यात आली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धोनी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या चित्रपटाचे नाव 'एलएसजी: लेट्स गेट मॅरिड' (LSG: Lets Get Married) असे असून हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटातील कलाकारांचीही घोषणा करण्यात आली आहे.

या चित्रपटात नादीया, हरिश कल्याण, इवाना आणि योगी बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलमानी करणार आहेत. त्यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाची प्रोड्यूसर साक्षी धोनी आहे.

या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ते एका ऍनिमेशनच्या स्वरुपातील असून त्याच प्रमुख कलाकारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. तसेच अशी चर्चा आहे की धोनी एंटरटेनमेंटने फिल्म प्रोडक्शनची सुरुवात कमी बजेटच्या चित्रपटापासून केली आहे.

धोनीचे व्यावसाय

एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑगस्ट 2020 मध्येच निवृत्त झाला आहे. पण असे असले तरी तो वेगवेगळ्या व्यावसायात त्याचे पाऊल टाकत आहे. त्याने फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करण्याबरोबरच धोनीने अनेक ब्रँड्समध्ये गुंतवणूकही केलेली आहे.

त्याची सेव्हन, स्पोर्ट्सफिट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड, ऱ्हिती स्पोर्ट्स अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. तसेच त्याने सेंद्रिय शेतीदेखील सुरू केली आहे. याशिवाय त्याच्या क्रिकेट अकादमी देखील आहेत.

(Dhoni Entertainment’s first film ‘Let’s Get Married’ announced)

धोनी भारताचा यशस्वी कर्णधार

धोनीला भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी अशी आयसीसी स्पर्धांची तीन विजेतीपदे मिळवली आहेत. तसेच त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा कसोटीत अव्वल क्रमांकही मिळवला होता.

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळताना 44.96 च्या सरासरीने 17266 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 16 शतकांचा आणि 108 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने यष्टीमागे 829 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT