MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak

MS Dhoni: पडदा उठला! 'त्या' दोघांना माहित होतं, वर्ल्डकप 2019 सेमीफायनल कॅप्टनकूलचा शेवटचा सामना

एमएस धोनीचा वर्ल्डकप 2019 सेमीफायनल अखेरचा सामना असल्याची टीम इंडियातील दोन सदस्यांना कल्पना होती.

MS Dhoni last match: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दोन वर्षे झाली असली, तरी त्याची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही. धोनीने त्याचा अखेरचा सामना 2019 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत खेळला होता.

दरम्यान, हा त्याचा अखेरचा सामना होता, याची कल्पना त्याने त्याचाच भारतीय संघातील वारस समजल्या जाणाऱ्या खेळाडूला दिला होती. याबद्दल भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

श्रीधर यांनी 'कोचिंग बियाँड - माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम' या पुस्तकात खुलासा केला आहे की धोनीने ऋषभ पंतशी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्याच्या राखीव दिवशी चर्चा करताना त्याला त्याच्या अखेरच्या सामन्याची कल्पना दिली होती.

MS Dhoni
Ruturaj Gaikwad on MS Dhoni: सलग 7 षटकार ठोकणारा ऋतुराज म्हणतोय, 'धोनीकडून शिकलोय की...'

श्रीधर यांनी पुस्तकात लिहिले आहे की 'मी आता खुलासा करू शकतो की बीसीसीआयबरोबर अँटिग्वामधून मी मुलाखतीसाठी उपस्थित होतो. तेव्हा मला माहित होते की धोनीने त्याचा अखेरचा सामना खेळला आहे. त्याने अर्थात त्यावेळी जाहीर केले नव्हते, पण मी तुम्हाला सांगतो की मला हे कसे कळाले होते.'

'मँचेस्टरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्याच्या राखीव दिवसाच्या सकाळी मी ब्रेकफास्ट हॉलमध्ये पोहचणारा पहिला सदस्य होतो. मी माझी कॉफी पीत होतो, तेव्हा एमएस आणि ऋषभ आत आले. त्यांनी त्यांचा नाश्ता घेतला आणि माझ्या टेबलवर बसायला आले.'

MS Dhoni
Gautam Gambhir on MS Dhoni: 'धोनीची इच्छा होती...', गंभीरने 2011 वर्ल्डकप फायनलबद्दल सांगितली आठवण

'न्यूझीलंडला अजून काहीच षटके फलंदाजी करायची होती. त्यानंतर आम्हाला फलंदाजी करायची होती. त्यामुळे सामना लवकर संपणार होता. त्यावेळी ऋषभने एमएसला हिंदीमध्ये सांगितेले की भैय्या, सर्वजण आजच लंडन वैयक्तिकरित्या जायचा विचार करत आहेत. तू पण येणार आहेस का? त्यावेळी ऋषभला एमएसने उत्तर दिले होते की मला भारतीय संघाबरोबर शेवटचा बस प्रवास मिस करायचा नाही.'

तसेच श्रीधर यांनी पुढे लिहिले की 'मी कोणाशीही धोनीचा आदर ठेवून या संभाषणाबद्दल बोललो नाही. त्याने मला विश्वासात घेतले होते. त्यामुळे मी याबद्दल रवी शास्त्री, भारत अरूणच नाही, तर माझ्या पत्नीशीही याबद्दल बोललो नव्हतो.'

MS Dhoni
Dhoni Pandya Video: बादशाहच्या रॅपवर धोनी-पांड्याचा ठेका; दोघांचा डान्स व्हायरल

भारतीय संघ हा सामना 18 धावांनी पराभूत झाला होता. या सामन्यात धोनी 72 चेंडूत 50 धावा करून धावबाद झाला होता. तो ज्यावेळी बाद झाला, त्यावेळी भारताला 9 चेंडूत 24 धावांची गरज होती. पण धोनी बाद झाल्यानंतर भारतीय संघ पराभूत झाला.

या सामन्यानंतर धोनीने एक वर्षाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे. तो आता आयपीएल 2023 स्पर्धेत खेळताना दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com