football
football Kishor Petkar
क्रीडा

GPL : धेंपो, वेळसाव क्लबला पूर्ण गुण

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी धेंपो स्पोर्टस क्लबने वास्को स्पोर्टस क्लबला 2-1फरकाने नमविले, तर वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने यूथ क्लब मनोरा संघावर 3-0 फरकाने सफाईदार विजय प्राप्त केला. (Dhempo Sports Club defeated Vasco Sports Club)

म्हापसा (Mapusa) येथील धुळेर स्टेडियमवर वास्को (Vasco) क्लबचा खेळाडू पिडरॉय कार्व्हालो व प्रशिक्षक मिकी फर्नांडिस यांना रेड कार्ड दाखविण्यात आले. रेफरी तेजस नागवेकर यांना अपशब्द वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली. धेंपो क्लबने पूर्वार्धात दोन गोलची आघाडी घेतली. त्या बळावर त्यांनी सामना जिंकला. साईश बागकर याने चौथ्या मिनिटास गोल केल्यानंतर पेद्रू गोन्साल्विसने 20 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर धेंपो क्लबची आघाडी भक्कम केली. वास्को क्लबची पिछाडी 46 व्या मिनिटास जॉस्टन कार्दोझ याने पेनल्टी फटक्यावर कमी केली.

पेद्रू गोन्साल्विसच्या असिस्टवर साईशने चेंडूवर ताबा राखत वास्को (Vasco) क्लबचा अनुभवी गोलरक्षक लुईस बार्रेटो याला चकवा दिला. नंतर वास्कोच्या सॅनविल डिकॉस्ताने धेंपोच्या व्हिएरी कुलासो याला गोलक्षेत्रात धोकादायक टॅकल केली. यावेळी रेफरीने स्पॉट किकची खूण केल्यानंतर पेद्रूने अचूक फटका मारला. दोन गोलने (Goal) पिछाडीवर गेल्यानंतर वास्को क्लबला संधी मिळाली, पण जोशुआ डिसिल्वाचा हेडर लक्ष्य साधू शकला नाही. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच मिनिटास वास्को क्लबला पेनल्टी फटक्याचा लाभ मिळाला. धेंपोच्या व्हिएरी कुलासोने वास्कोच्या चिराग म्हार्दोळकर याला पाडले. यावेळी जॉस्टनने पेनल्टी फटका वाया जाऊ दिला नाही.

वेळसावची सरशी

वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबच्या विजयात आघाडीपटू कॅजिटन फर्नांडिस चमकला. त्याने दोन गोल (Goal) केले. सामना घोगळ-मडगाव येथील चौगुले महाविद्यालय मैदानावर झाला. कॅजिटनने पहिला गोल पेनल्टी फटक्यावर ३४व्या मिनिटास केला. नंतर २० वर्षांखालील खेळाडू रोहन रॉड्रिग्ज याने ३६व्या मिनिटास वेळसावची आघाडी २-० अशी मजबूत केली. उत्तरार्धातील खेळात कॅजिटनने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT