GCA Premier League | Vikas Singh  Dainik Gomantak
क्रीडा

GCA Premier League: धेंपो, एमसीसी अंतिम फेरीच्या दिशेने

अनुक्रमे पणजी जिमखाना, साळगावकर क्लबवर वर्चस्व

किशोर पेटकर

GCA Premier League: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी अनपेक्षित निकालाची नोंद झाली तर अंतिम लढतीत धेंपो क्रिकेट क्लबसमोर एमसीसी संघाचे आव्हान असेल.

स्पर्धेच्या उपांत्य लढतीत मंगळवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर धेंपो क्लबने पणजी जिमखान्यावर पहिल्या डावात 194 धावांची आघाडी घेतली, नंतर दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावा करून एकूण आघाडी 200 धावांची केली.

विकास सिंगचे नाबाद दीडशतक, त्याने शेवटच्या विकेटसाठी फरदीन खान (1) याच्यासमवेत केलेली 99 धावांच्या झुंजार भागीदारीमुळे धेंपो क्लबने पहिल्या डावात 402 धावा केल्या. नंतर विकास व रोहन बोगाटी यांनी एकत्रित नऊ गडी टिपत पणजी जिमखान्याचा पहिला डाव 208 धावांत गुंडाळला.

कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर साळगावकर क्लबच्या 207 धावांना उत्तर देताना एमसीसीने 345 धावा करून 138 धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर साळगावकरने दुसऱ्या डावात 1 बाद 14 धावा केल्या. ते अजून 124 धावांनी मागे आहेत.

संक्षिप्त धावफलक

पर्वरी येथे ः

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 97.5 षटकांत सर्वबाद 402 (विकास सिंग नाबाद 152, प्रथमेश डोंगरे 3-33) व दुसरा डाव ः 1 षटकात बिनबाद 6 विरुद्ध पणजी जिमखाना, पहिला डाव ः 76.1 षटकांत सर्वबाद 208 (राहुल मेहता 48, स्नेहल कवठणकर 57, शुभम देसाई 39, हेरंब परब 24, फरदीन खान 1-35, रोहन बोगाटी 4-43, विकास सिंग 5-91).

कांपाल-पणजी येथे ः

साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 207 व दुसरा डाव ः 7 षटकांत 1 बाद 14 विरुद्ध एमसीसी, पहिला डाव ः 99.5 षटकांत सर्वबाद 345 (सुमीरन आमोणकर 40, प्रथमेश गावस 37, शंतनू नेवगी 29, शौर्य जगलन 67, कीथ पिंटो 27, पियुष यादव 45, दर्शन मिसाळ 57, विजेश प्रभुदेसाई 1-90, लखमेश पावणे 2-53, दीपराज गावकर 1-19, अमूल्य पांड्रेकर 2-67, यश कसवणकर 4-81).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

SCROLL FOR NEXT