Super League Football Dainik Gomantak
क्रीडा

Super League Football: धेंपो क्लब विजयासह अग्रस्थानी

सुपर लीग फुटबॉल: कळंगुट असोसिएशनला एका गोलने नमविले

गोमन्तक डिजिटल टीम

Super League Football गौरव काणकोणकर याने पूर्वार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने कळंगुट असोसिएशनला 1-0 फरकाने नमवून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेच्या सुपर लीग फेरीत अग्रस्थान मिळविले. सामना शनिवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्याचा मानकरी ठरलेल्या गौरवने 13 व्या मिनिटास गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या, परंतु सफलता मिळाली नाही. धेंपो क्लबचा हा 13 सामन्यांतील आठवा विजय ठरला.

त्यांचे आता 26 गुण झाले असून स्पोर्टिंग क्लब द गोवा व साळगावकर एफसी (प्रत्येकी 25) यांच्यावर एका गुणाची आघाडी घेतली आहे. कळंगुटला चौथा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे 13 लढतीनंतर त्यांचे 19 गुण कायम राहिले.

साळगावकरचा युवा संघ विजयी

दरम्यान, माँत द गिरी मैदानावर झालेल्या आरएफडीएल (रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग) फुटबॉल स्पर्धेत साळगावकर एफसीने चर्चिल ब्रदर्सवर 2-1 फरकाने मात केली. विश्रांतीला दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत होते.

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास मार्क कार्व्हालोने साळगावकरला आघाडीवर नेल्यानंतर 22 व्या मिनिटास आलेंत कुलासोने चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधून दिली. बदली खेळाडू बेकहॅम डायस याने 71 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे साळगावकर एफसीने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Porascade Junction Accident: पोरस्कडे जंक्शनाकडेन भिरांकूळ अपघात

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

SCROLL FOR NEXT