Dhanush Srikanth Dainik Gomantak
क्रीडा

कौतुकास्पद! धनुषची ISSF Junior World Cup मध्ये सुवर्णमय कामगिरी, भारतासाठी जिंकले तिसरे गोल्ड

भारताचा नेमबाज धनुष श्रीकांतने सोमवारी ISSF ज्यूनियर वर्ल्डकपमध्ये सुवर्णपद जिंकले आहे.

Pranali Kodre

Dhanush Srikanth Win India's 3rd Gold Medal: भारताचा नेमबाज धनुष श्रीकांतने सोमवारी ISSF ज्यूनियर वर्ल्डकपमध्ये सुवर्णपद जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात ही सुवर्णमय कामगिरी नोंदवली. भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. तसेच एकूण नववे पदक ठरले.

भारताने या स्पर्धेत 3 सुवर्ण पदके, 4 रौप्य पदके आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत. त्यामुळे भारतीय संघ पदक तालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

जर्मनीमधील सुहल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत धनुषने पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात 249.4 गुणांसह सुवर्णपदक मिळवले. तसेच स्वीडनच्या पोंटस कालिनने 248.1 गुणांसह रौप्य आणि फ्रान्सच्या रोमन ऑफ्रेरेने 227.1 गुणांसह कांस्य पदकावर नाव कोरले.

दरम्यान, पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत धनुषसह प्रथम भडाना आणि अभिनव शॉ हे दोन भारतीय नेमबाजांनीही प्रवेश केला होता.

क्लालिफिकेशनमध्ये धनुष 628.4 गुणांसह सहाव्या क्रमांकावर होता. तसेच प्रथम 628.7 गुणांसह त्याच्यापुढे पाचव्या क्रमांकावर होता आणि अभिनव 626.7 गुणांसह आठव्या स्थानावर होता. पण अंतिम फेरीत अभिनव सातव्या क्रमांकावर राहिला, तर प्रथम चौथ्या क्रमांकावर राहिला.

स्किट मिश्र प्रकारात कांस्य

भारताला स्किट मिश्र प्रकारातही कांस्य पदक मिळाले. भारताच्या हरमेहर लैली आणि संजना सूद यांनी शूटऑफमध्ये स्वीडनच्या डेव्हिड जॉनसन आणि फेलेशिया रॉस यांना पराभूत करत कांस्य पदक जिंकले.

दरम्यान, सुहलमध्ये होत असलेल्या ISSF ज्यूनियर वर्ल्डकपमध्ये 46 देशातील 511 नेमबाज सहभागी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT