Goa Professional Football League Dainik Gomantak
क्रीडा

Goa Professional Football League: धेंपो क्लबचा सलग दुसरा विजय; पणजी फुटबॉलर्सविरुद्ध लक्ष्मणरावचा गोल

लक्ष्मणराव राणे याच्या गोलमुळे धेंपो क्लबला यश

किशोर पेटकर

Goa Professional Football League: गतविजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना पणजी फुटबॉलर्सवर 1-0 फरकाने मात केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्याच्या पूर्वार्धात लक्ष्मणराव राणे याने नोंदविलेल्या गोलमुळे धेंपो क्लबने सलग दुसऱ्या लढतीत पूर्ण तीन गुण प्राप्त केले. अगोदरच्या लढतीत त्यांनी कुठ्ठाळी व्हिलेजर्सला नमविले होते.

गतविजेत्यांचे आता दोन लढतीनंतर सहा गुण झाले आहेत. पणजी फुटबॉलर्सला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीत त्यांना कळंगुट असोसिएशननेही एका गोलने हरविले होते.

निर्णायक गोल सामन्याच्या १६व्या मिनिटास झाला. धेंपो क्लबच्या आर्नोल्ड ऑलिव्हेरा याने शानदार ड्रिबलिंगचे कौशल्य प्रदर्शित करत लक्ष्मणराव याला चेंडू पुरविला. त्याने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवा देण्याचे काम चोख बजावले.

स्पर्धेत सोमवारी (ता. ४) स्पोर्टिंग क्लब द गोवा व एफसी गोवा यांच्यात म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सामना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT