Super League Football Dainik Gomantak
क्रीडा

Super League Football: धेंपो क्लबने चर्चिल ब्रदर्सला नमविले

एफसी गोवाने साळगावकर एफसीला गोलबरोबरीत रोखले

किशोर पेटकर

Super League Football: अटीतटीच्या लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबने चर्चिल ब्रदर्सला 2-1 फरकाने नमवून जीएफए सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या स्थानी प्रगती केली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटास गोल नोंदवून एफसी गोवाने अग्रस्थानावरील साळगावकर एफसीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

नागोवा पंचायत मैदानावर सामन्यातील अर्ध्या तासाच्या आत दोन गोल करून धेंपो क्लबची स्थिती भक्कम केली. बेनेस्टन बार्रेटो याने आठव्या, तर पेद्रो गोन्साल्विसने 28व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

69व्या मिनिटास ट्रिजॉय डायसने चर्चिल ब्रदर्सची पिछाडी एका गोलने कमी केली. स्पर्धेतील सातव्या विजयामुळे धेंपो क्लबचे आता 23 गुण झाले आहेत. स्पर्धेतील तिसऱ्या पराभवामुळे चर्चिल ब्रदर्सचे 17 गुण कायम राहिले.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर मार्क कार्व्हालो याने 70व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे साळगावकर संघ एका गोलने आघाडीवर होता. 90व्या मिनिटास व्हेलिंग्टन फर्नांडिसने केलेल्या गोलमुळे एफसी गोवा संघाला बरोबरीचा एक गुण मिळवता आला.

साळगावकर संघाची ही चौथी बरोबरी ठरली. 25 गुणांसह त्यांचे अव्वल स्थान कायम राहिले. एफसी गोवाची ही स्पर्धेतील आठवी बरोबरी ठरली. त्यांचे 20 गुण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT