Delhi Pollution | World Cup 2023 PTI/ANI
क्रीडा

World Cup 2023: पाऊस-वारा नाही, तर प्रदुषणामुळे दिल्लीवर वर्ल्डकप सामना गमावण्याची वेळ?

Bangladesh vs Sri Lanka: दिल्लीतील प्रदुषण गेल्या काही दिवसात क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Pranali Kodre

Delhi Pollution may force ICC to Cancel Sri Lanka vs Bangladesh ODI Cricket World Cup 2023 match:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील सामने भारतभरातील 10 विविध शहरांमध्ये खेळवण्यात येत आहेत. यात दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमचाही समावेश आहे. दिल्लीतही 5 सामने या स्पर्धेतील सामने खेळवण्याचा नियोजन करण्यात आले होते.

परंतु, आता या स्पर्धेतील या मैदानावरील अखेरच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मागील अनेक दिवसांपूर्वी दिल्लीतील प्रदुषण चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात प्रदुषण असल्याचे आढळले आहे, अशात काही क्रिकेट संघांनी तिथे आपले सराव सत्रही रद्द केले होते.

आता दिल्लीमध्ये सोमवारी बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात अखेरचा सामना होणार आहे. मात्र हा सामना दिल्लीतील वाईट हवामान गुणवत्तेमुळे तिथून हलवला जाण्याची किंवा रद्द केला जाण्याची चर्चा सुरू आहे.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार आयसीसी खराब हवामान गुणवत्तेमुळे हा सामना रद्द करू शकतात. जर असे झाले, तर वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच अशा कारणाने सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

तथापि, दिल्लीतील हवामान गुणवत्तेमुळे यापूर्वी मात्र काही सामन्यांवर परिणाम झालेला आहे. यापूर्वी खेळाडूंना श्वास घेण्यात होत असलेल्या समस्येमुळे अनेकदा रणजी ट्रॉफीचे सामनेही या मैदानावर थांबवण्यात आले आहेत.

नोव्हेंबर 2016 मध्ये वायु प्रदुषण आणि धुक्यामुळे दिल्लीतील दोन सामने रद्द करण्यात आले होते. इतकेच नाही, तर डिसेंबर 2017 मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यातही दिल्लीतील प्रदुषणामुळे व्यत्यय आला होता. त्यावेळी खेळाडूंना उटल्या झाल्या होत्या.

त्यानंतर 2019 मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी20 सामन्यावेळीही याबद्दल चर्चा झाली होती. या गोष्टी लक्षात घेता आता सोमवारी होणाऱ्या सामन्याबद्दल काय निर्णय घेतला जाणार, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतून अधिकृतरित्या बाहेर झाले आहेत, तर श्रीलंकाचेही उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा अगदी धूसर आहेत.

सध्या श्रीलंका 7 सामन्यांत 2 विजय मिळवून गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेश 7 सामन्यांतील एका विजयासह 9 व्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT