Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

दुष्काळात तेरावा! दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज IPL 2023 मधून 'या' कारणामुळे बाहेर

सलग 5 पराभव पत्करलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्यांचा एक युवा वेगवान गोलंदाज आयपीएल 2023 हंगामातून बाहेर झाला आहे.

Pranali Kodre

Kamlesh Nagarkoti ruled out of IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या विजयासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यातच संघाला आणखी धक्का बसला आहे. संघाचा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आयपीएल 2023 हंगामातून बाहेर झाला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 23 वर्षीय कमलेशला पाठीच्या दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आता उर्वरित आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. त्याला आयपीएल २०२२ लिलावात दिल्लीने 1.1 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यांनी त्याला 2023 हंगामासाठीही संघात कायम केले. तो सर्वात महागड्या अनकॅप खेळाडूंपैकी एक आहे.

नागरकोटीला 2018 मध्येच कोलकाताना आट रायडर्सने खरेदी केले होते. पण त्याला पाठीच्या दुखापतीमुळेच 2018 आणि 2019 आयपीएल हंगामात खेळता आले नाही. त्यानंतर त्याने 2020 साली कोलकाताकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.

मात्र त्याने आत्तापर्यंत केवळ 12 सामनेच खेळले आहेत. यामध्ये त्याला 57 च्या सरासरीने 5 विकेट्सच घेता आल्या आहेत. यापाचही विकेट्स त्याने कोलकातासाठी खेळताना घेतल्या आहेत.

त्याने 2022 मध्ये दिल्ली संघाकडून केवळ एक सामना खेळला. त्यानंतर चालू हंगामात मात्र, त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही आणि आता तो या हंगामातूनच बाहेर झाला आहे.

हे दोन खेळाडू घेऊ शकतात जागा

काही रिपोर्ट्सनुसार बंगालचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन आणि उत्तर प्रदेशचा फलंदाज प्रियम गर्ग हे दिल्ली कॅम्पमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाची दिल्ली कॅपिटल्स संघात नागरकोटीच्या जागेवर निवड होऊ शकते.

दिल्लीला पहिल्या विजयाची प्रतिक्षा

दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या आयपीएल 2023 हंगामातील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत या हंगामात 5 सामने खेळले असून एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे ते सध्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत.

आता दिल्लीला पुढील सामना 20 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवून या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी दिल्ली उत्सुक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT