Delhi Capitals Net Bowler Injury Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: सराव सत्रात भीषण दुर्घटना! रक्ताने माखलेला चेहरा अन् खेळाडूचा टाहो; दिल्लीचं टेन्शन वाढलं Watch Video

Delhi Capitals Net Bowler Injury: दिल्लीच्या एका गोलंदाजाला सरावादरम्यान इतकी गंभीर दुखापत झाली की, त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवावे लागले.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ चा ३५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगणार आहे. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी दिल्लीचा संघ आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर कसून सराव करत होता. मात्र, या सराव सत्राला एका भीषण अपघाताचे गालबोट लागले आहे.

दिल्लीच्या एका गोलंदाजाला सरावादरम्यान इतकी गंभीर दुखापत झाली की, त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवावे लागले. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावर या अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

मैदानावरच कोसळला खेळाडू

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्सचा एक नेट बॉलर सराव सत्रात गोलंदाजी करत होता. फलंदाजाने मारलेला एक वेगवान चेंडू थेट या गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आदळला. बाउन्सरचा वेध घेण्याच्या प्रयत्नात असताना चेंडू इतक्या वेगाने लागला की, या खेळाडूच्या चेहऱ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.

वेदनेने विव्हळत असलेला हा खेळाडू मैदानावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे दृश्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले इतर खेळाडू आणि कर्मचारी धावत आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मैदानावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले आणि लगेचच रुग्णवाहिका बोलावून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ

दिल्ली कॅपिटल्सने अद्याप या खेळाडूच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत बुलेटिन जारी केलेले नाही. मात्र, या घटनेमुळे संघातील वातावरण सुन्न झाले आहे. आयपीएल २०२६ मध्ये दिल्लीचा प्रवास आतापर्यंत संमिश्र राहिला आहे.

६ सामन्यांपैकी ३ सामने जिंकून संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत सराव सत्रात घडलेल्या या दुर्घटनेमुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीला आपला पुढील सामना बलाढ्य पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा असून, अशा वेळी खेळाडूचे जखमी होणे संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

अपराजित पंजाबचे तगडे आव्हान

दुसरीकडे, दिल्लीचा सामना अशा संघाशी आहे जो या हंगामात अद्याप एकही सामना हरलेला नाही. पंजाब किंग्स ५ विजयांसह आणि ११ गुणांनिशी गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. पंजाबचे सर्वच खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत.

अशा फॉर्ममध्ये असलेल्या संघाला त्यांच्याच मैदानात रोखणे दिल्लीसाठी मोठे आव्हान असेल. त्यातच सरावादरम्यान झालेल्या या भीषण अपघातामुळे दिल्लीच्या गोटात घबराटीचे वातावरण पसरले आहे. आता जखमी खेळाडूच्या प्रकृतीबाबत दिल्ली कॅपिटल्स काय माहिती देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: शनीचे 'महागोचर'! 5 राशींच्या लोकांना बनवणार करोडपती आणि भाग्यवान; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT