David Warner Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सकडून झाली चूक, मग BCCI नेही केली कॅप्टन वॉर्नरवर कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला संघाकडून सनरायझर्स हैदाराबाद विरुद्धच्या सामन्यात झालेल्या चूकीमुळे दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले आहे.

Pranali Kodre

David Warner has been Fined 12 Lakh: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने अखेरच्या षटकात 7 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात दिल्लीकडून झालेल्या एका चूकीमुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात वॉर्नरवरील कारवाईची माहिती देण्यात आली आहे. याबद्दल प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे की 'राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने षटकांची गती कमी राखल्याने वॉर्नरवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.'

'तसेच ही दिल्ली कॅपिटल्सची आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गती कमी राखण्याबाबतची ही या हंगामातील पहिली चूक होती. त्यामुळे वॉर्नरवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.'

दरम्यान, अशाप्रकारे षटकांची गती कमी राखल्याबद्दल लाखो रुपयांचा दंड होणारा वॉर्नर पहिला कर्णधार नाही. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल यांना देखील आयपीएल 2023 हंगामात षटकांची गती कमी राखल्यामुळे 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून दुसऱ्यांदा षटकांची गती कमी राखली गेल्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यानंतर प्रभारी कर्णधार विराट कोहलीवर 24 लाखांचा दंड आणि संघावरही दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

दिल्लीने जिंकला सामना

सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 144 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून मनिष पांडेने 34 आणि अक्षर पटेलने 34 धावांची खेळी केली.

या दोघांव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारनेही चांगली गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 11 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर टी नटराजन याने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे हैदराबादला 20 षटकात 6 बाद 137 धावांच करता आल्या. हैदराबादकडून मयंक अगरवालने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तसेच हेन्रिक क्लासेनने 31 धावांची खेळी केली.

दिल्लीकडून एन्रिक नॉर्किया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

SCROLL FOR NEXT