Jasprit Bumrah | Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मुंबई-दिल्लीला मिळाले बुमराह-पंतसाठी बदली खेळाडू, 'हे' दोन क्रिकेटर्स घेणार जागा

आयपीएल 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे दुखापतग्रस्त खेळाडू अनुक्रमे जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्या बदली खेळाडूंची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Replacements for Rishabh Pant and Jasprit Bumrah: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेआधी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सला मोठे धक्के बसले होते. दिल्लीचा नियमित कर्णधार ऋषभ पंत आणि मुंबईचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या हंगामातून बाहेर झाले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या बदली खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.

शुक्रवारी (31 मार्च) दिल्ली कॅपिटल्सने पंतऐवजी अभिषेक पोरेलची आणि मुंबई इंडियन्सने बुमराह ऐवजी संदीप वॉरियरची बदली खेळाडू म्हणून घोषणा केली.

आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार पोरेलला 20 लाखांच्या किमतीत दिल्लीने संघात सामील करून घेतले आहे. तसेच संदीपला संघात घेण्यासाठी मुंबईने 50 लाख रुपये मोजले आहेत.

पोरेल हा यष्टीरक्षक फलंदाज असून तो देशांतर्गत क्रिकेच बंगालसाठी खेळतो. त्याने आत्तापर्यंत 16 प्रथम श्रेणी सामने, 3 लिस्ट ए सामने आणि 3 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने प्रथम श्रेणीमध्ये 695 धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए मध्ये 54 धावा आणि टी20मध्ये 22 धावा केल्या आहेत.

31 वर्षीय वेगवान गोलंदाज संदीपने 2021 मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. तो भारताकडून 29 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकमेव टी20 सामना खेळला आहे. याशिवाय त्याने 66 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात 217 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 69 लिस्ट ए सामने खेळले असून 83 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 68 टी२० सामने खेळताना 62 विकेट्स घेतल्या आहेत.

या कारणांमुळे पंत-बुमराह बाहेर

पंतचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस गंभीर कार अपघात झाला होता. त्या अपघातात त्याला काही गंभीर दुखापती झाल्या असल्याने त्याला साधारण एक वर्षासाठी क्रिकेटपासून दूर व्हावे लागले आहे. त्यामुळे तो आयपीएल 2023 स्पर्धेसाठी उपलब्ध नाही.

तसेच बुमराह बरेच महिने पाठीच्यादुखापतीचा सामना करत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी असे समोर आले होते की त्याने पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे तो देखील आयपीएलच्या या 16 व्या हंगामातून बाहेर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या 10 वर्षांत पहिल्यांदाच बुमराह आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT