Goa Sports धुळेर-म्हापसा चेंडूवर ताबा राखण्याच्या प्रयत्नात वास्को स्पोर्टस क्लब व गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब संघातील खेळाडू. Dainik Gomantak
क्रीडा

वास्कोची 'गार्डियन एंजल' क्लबवर मात

चुरशीच्या लढतीत वास्को स्पोर्टस क्लबने पिछाडीवरून गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबचे आव्हान 2-1 फरकाने परतावून लावत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: चुरशीच्या लढतीत वास्को स्पोर्टस क्लबने (Vasco Sports Club) पिछाडीवरून गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबचे आव्हान 2-1 फरकाने परतावून लावत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

गार्डियन एंजल क्लबने सामन्याच्या तिसऱ्या मिनिटास आघाडी घेतली. गोपी गाड याने हा गोल केला, मात्र नंतर वास्को क्लबने जोरदार मुसंडी मारत सामना जिंकला. चिराग म्हार्दोळकर व फ्रान्सिस फर्नांडिस यांच्या गोलमुळे वास्कोला मोहिमेची सुरवात विजयाने करता आली. वास्को क्लबचा अनुभवी गोलरक्षक लुईस बार्रेटो याची दक्षताही लक्षणीय ठरली. गार्डियन एंजलच्या गोपी याने केलेले गोल प्रेक्षणीय होता. त्याने मैदानाच्या उजव्या बाजूतून धाव घेत नंतर सणसणीत फटक्यावर गोलरक्षक लुईस बार्रेटोचा बचाव भेदला.

सामन्यातील अर्ध्या तासाच्या खेळानंतर वास्को क्लबने बरोबरी साधली. बेर्साल व्हिएगसच्या असिस्टवर चिरागने चेंडूला अचूक दिशा दाखविताना गार्डियन एंजलचा गोलरक्षक ऑस्विन रॉड्रिग्जला चकवा दिला.

गार्डियन एंजल क्लबच्या साहिल भोकारे याने गोलसाठी प्रयत्न केले, पण त्याला यश लाभले नाही. विश्रांतीस चार मिनिटे बाकी असताना वास्कोचा गोलरक्षक लुईस बार्रेटो याच्या दक्षतेमुळे गार्डियन एंजलला पुन्हा आघाडी घेता आली नाही. गिल्बर्ट ऑलिव्हेराच्या फ्रीकिकवर फेड्रिक फर्नांडिसने नेम बार्रेटोने रोखला. विश्रांतीनंतर गार्डियन एंजलच्या सेटपिसेस व्यूहरचनेवर पीटर कार्व्हालोचा फटका बार्रेटोने फोल ठरविला. लगेच प्रतिहल्ल्यावर फ्रान्सिस फर्नांडिसने चेंडूला अचूक दिशा दाखविल्यामुळे वास्को क्लबला आघाडी मिळाली, ती त्यांनी अखेरपर्यंत टिकवत विजयाचे पूर्ण गुण वसूल केले.

साळगावकर-सेझा लढत आज

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत गुरुवारी (ता. 21) म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर साळगावकर एफसी व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात सामना खेळला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT