Anura Prabhudesai Dainik Gomantak
क्रीडा

National Games 2023: मानांकित बॅडमिंटनपटूंना पराभवाचा धक्का

द्वितीय मानांकित मालविका, तृतीय मानांकित अश्मिता बाहेर

किशोर पेटकर

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील महिला एकेरीत रविवारी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्के सहन करावे लागले. द्वितीय मानांकित महाराष्ट्राची मालविका बनसोड पराभूत झाली, तर आसामची तृतीय मानांकित अश्मिता चलिहा हिला सामना अर्ध्यावर सोडावा लागला.

स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर सुरू आहे. मालविका हिला गुजरातच्या अदिता राव हिच्याकडून राऊंड ऑफ १६ फेरीत २१-१५, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला.

आसामच्या सांघिक सुवर्णपदक विजेत्या कामगिरीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या अश्मिता हिला तेलंगणाच्या एम. मेघना रेड्डी हिच्याविरुद्ध २१-१७, १७-१७ अशी स्थिती असताना जखमी निवृत्त व्हावे लागले.

महिला एकेरीतील अन्य लढतीत अव्वल मानांकित आकर्षी कश्यप हिला गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाई हिने झुंजविले. सामन्यात आकर्षी १९-२१, २५-२३, १३-७ अशी पुढे असताना अनुरा हिने दुखापतीमुळे सामना सोडून दिला.

महिला एकेरीत अन्य मानांकित खेळाडूंनी आगेकूच राखली. महाराष्ट्राची श्रुती मुंदडा हिने तेलंगणाच्या श्रीयांशी वालिशेट्टी हिच्यावर २१-१७, २१-१७ असा, तर चौथी मानांकित हरियानाची अनुपमा उपाध्याय हिने महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वे हिला २१-११, २१-१५ असे हरविले.

आसामच्या सांघिक सुवर्णपदक विजेत्या संघातील ईशारानी बरुआ हिनेही महिला एकेरीत पुढील फेरी गाठताना दिल्लीच्या आशी रावत हिला पहिले गेम गमावल्यानंतर १६-२१, २१-१८, २१-६ असे नमविले.

पुरुष एकेरीत माजी राष्ट्रीय विजेता मध्य प्रदेशचा सौरभ वर्मा याने कर्नाटकच्या एम. रघू याच्यावर २१-१६, २२-२० असा चमकदार विजय प्राप्त केला.

अव्वल मानांकित केरळच्या किरण जॉर्ज याला मात्र संघर्ष करावा लागला. आंध्र प्रदेशच्या के. जगदीश याच्याविरुद्ध त्याने २१-११, १९-२१, २१-११ असा विजय मिळविला.

द्वितीय मानांकित कर्नाटकच्या मिथुन मंजुनाथ याने सोपा विजय साकारला. त्याने तमिळनाडूच्या सिद्धांत गुप्ता याला २१-१४, २१-१७ अशा फरकाने पराजित केले.

तृतीय मानांकित दिल्लीच्या कार्तिकेय गुलशनकुमार याने गोव्याच्या करण धावसकर याच्यावर २१-८, २१-७ असा एकतर्फी विजय संपादन केला. चौथ्या मानांकित तेलंगणाच्या एम. तरुण याने महाराष्ट्राच्या वरुण कपूर याला २१-५, २१-६ असे नमविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT