Deepak Hooda Dainik Gomantak
क्रीडा

IND VS WI: भांडणाने बदलले नशीब! दीपक हुडा झळकणार वनडेमध्ये

दीपक हुड्डा ज्याच्या संघात प्रवेशाची शक्यता दिसत नव्हती, परंतु कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूला संधी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होताच एक नाव पाहून चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांना धक्का बसला. दीपक हुड्डा यांच्याबद्दल बोलले जात आहे, ज्याच्या संघात प्रवेशाची शक्यता दिसत नव्हती, परंतु कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूला संधी दिली आहे.

दीपक हुडाचा (Deepak Hooda) संघात समावेश का करण्यात आला, त्याच्यामध्ये काय दिसले आणि त्याचा भारतीय संघाला कसा उपयोग होऊ शकतो? हे प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच असतील. दीपक हुड्डा टीम इंडियासाठी कितपत फायदेशीर ठरेल याचे उत्तर तुम्हाला मिळेल, पण आधी जाणून घ्या की एका भांडणामुळे या खेळाडूचे नशीब कसे बदलले आणि आता पहिल्यांदाच दीपक हुड्डाला टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी संधी कशी मिळाली आहे.

2021 वर्ष सुरू होताच दीपक हुडाच्या क्रिकेट करिअरमध्ये असा भूकंप आला ज्याची त्यानी कल्पनाही केली नसेल. बडोद्याकडून खेळणाऱ्या दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 च्या आधी संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघाचा कर्णधार कृणाल पंड्याने शिवीगाळ केल्याचा आरोप दीपक हुड्डाने केला. इतकेच नाही तर कुणालने त्याचे करिअर संपवण्याची धमकी दिल्याचा आरोप हुड्डाने केला.

हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून हे आरोप केले आणि त्यांनी संघाचा बायो-बबल सोडला. 11 वर्षे बडोद्यासाठी क्रिकेट खेळणारा हुड्डा नंतर राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला आणि त्यानंतर त्याने अशा धावा केल्या की चाहते पाहतच राहिले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हुडाने 6 सामन्यात 73.50 च्या अतुलनीय सरासरीने 294 धावा केल्या होत्या. इतकंच नाही तर त्याचा स्ट्राईक रेट 168 होता आणि त्याच्या बॅटमधून 23 चौकार आणि 17 षटकार निघाले.

उजव्या हाताचा फलंदाज दीपक हुडा अनेक कारणांमुळे टीम इंडियासाठी खूप खास खेळाडू आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाल्यापासून टीम इंडिया मॅच फिनिशरच्या शोधात आहे आणि दीपक हुडा मध्ये त्याची क्षमता दिसत आहे. दीपक हुडा 4 ते 7 क्रमांकापर्यंत कुठेही फलंदाजी करू शकतो.

हुड्डाकडे लाँग शॉट्स खेळण्याची क्षमता आहे, पण त्याचबरोबर एकेरी आणि दुहेरीत खेळ पुढे नेण्याची ताकद त्याच्यात आहे. हुड्डाकडे ऑफ स्पिनचेही कौशल्य आहे. हुड्डा गरज पडल्यास 4-5 षटके टाकू शकतो आणि याशिवाय तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. दीपक हुडाचा फिटनेसही अप्रतिम आहे जो त्याच्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट ठरला आहे.

दीपक हुडाच्या टीम इंडियात (Team India) आगमनामुळे भारतीय मिडिल ऑर्डर फलंदाजांवर दबाव वाढणार आहे. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव सध्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळत आहेत. आता दीपक हुडाच्या आगमनाने या खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण नक्कीच असेल. मात्र, टीम इंडिया दीपक हुड्डाला कधी आणि कुठे वापरते ते पाह्णे क्रिकेट प्रेमींसाठी रंजक ठरणार आहे.

वनडे टीम: रोहित शर्मा (Captain), केएल राहुल (Vice captain), ऋतुराज गायकवाड़, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (Wicketkeeper), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.

टी20 टीम: रोहित शर्मा (Captain), केएल राहुल (Vice captain), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (Wicketkeeper), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वाशिंगटन सुंदर, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT