शास्त्री मास्तर म्हणाले...विराटनं 2-3 महिने ब्रेक घ्यावा अन् कुठेतरी निघून जावं !

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीबद्दल बोलताना विराटला कुठेतरी निघून जाण्याचा सल्ला दिला.
Ravi Shastri & Virat Kohli
Ravi Shastri & Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबद्दल बोलताना विराटला कुठेतरी निघून जाण्याचा सल्ला दिला. 2-3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर त्याने परत यावे आणि मन मोकळ्या पुन्हा क्रिकेटला सुरुवात करावी. माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) यूट्यूब चॅनलवर बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, विराटच्या कसोटी कर्णधारपदावरुन निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे मी स्वतः आश्चर्यचकित झालो आहे. (Ravi Shastri Has Said That Virat Should Rest For A Few Days)

दरम्यान, रवी शास्त्री सध्या लिजेंड्स लीग क्रिकेटसाठी ओमानमध्ये आहेत. तिथे त्यांनी भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा उल्लेख केला. विराट कोहलीला (Virat Kohli) याबाबत विचारले असता ते म्हणाले, "विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यावर मला स्वतःला आश्चर्य वाटले.''

Ravi Shastri & Virat Kohli
ICC ODI Rankings: विराट अन् रोहित टॉप-10 मध्ये कायम, बुमराह सातव्या स्थानावर !

ते पुढे म्हणाले, ''तो आणखी दोन वर्षे संघाचा कर्णधार राहू शकला असता. काय झाले? मालिका गमावल्यास". पण नंतर त्यांनी विराटची पाठराखण करताना म्हटले की, "आपण सर्वांनी त्याने घेतलेल्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. विराट कोहलीच्या मनात काय चालले आहे हे कोणालाच कळत नाही".

तसेच, विराटबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, "मला वाटते की विराटने काही दिवस विश्रांती घ्यावी आणि कुठेतरी जावे, जेणेकरुन तो नव्या दमाने परत येईल. आणि पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करु शकेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com