CSK | IPL 2022 Latest News
CSK | IPL 2022 Latest News Dainik Gomantak
क्रीडा

CSK साठी मोठी बातमी, 'हा' धाकड 2021 नंतर पहिल्यांदाच IPL मध्ये परतणार

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 पुढील महिन्याच्या 31 तारखेपासून सुरु होत आहे. या लीगच्या 16व्या हंगामाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्याचवेळी, आयपीएलच्या महिनाभर आधी चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. CSK चा सर्वोत्कृष्ट खेळाडू IPL 2023 मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे.

CSK खेळाडू तंदुरुस्त

गेल्या वर्षी दुखापतींशी झुंज दिल्यानंतर, भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) म्हटले आहे की, 'मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.' विशेष म्हणजे, तो पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास तयार आहे. चहरला स्ट्रेस फ्रॅक्चर आणि नंतर मांडीच्या दुखापतीतून सावरणे कठीण झाले होते. तो भारताकडून शेवटचा बांगलादेशमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळला होता, जिथे तो फक्त तीन षटके टाकू शकला होता.

दुसरीकडे, चहर 2022 मध्ये भारतासाठी फक्त 15 सामने खेळू शकला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो T20 विश्वचषकातूनही बाहेर पडला होता. आता, चहर आयपीएलसाठी तयारी करत आहे, जिथे तो CSK कडून खेळणार आहे.

चहर काही महिन्यांपासून फिटनेसवर काम करत आहे

चहर म्हणाला की, 'मी माझ्या फिटनेसवर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मेहनत घेत आहे, मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आयपीएलसाठी चांगली तयारी करत आहे.' तो पुढे म्हणाला की, 'मला दोन मोठ्या दुखापती झाल्या. स्ट्रेस फ्रॅक्चर आणि मांडीला दुखापत झाली.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

SCROLL FOR NEXT