DC vs PBKS Dainik Gomantak
क्रीडा

DC vs PBKS: डेव्हिड वॉर्नरनने ड्रेसिंग रूममध्ये घातला राडा; व्हिडीओ व्हायरल

सामन्याच्या शेवटी, जिथे त्याने 'पुष्पा' चित्रपट 'झुकेगा नहीं...' ची सिग्नीचर स्टेप देऊन विजय साजरा केला म्हणायला हरकत नाही.

दैनिक गोमन्तक

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध 11 ओव्हरपूर्वीच सामना मिटवला तसेच पंजाब किंग्ज विरुद्ध नऊ गडी राखून शानदार विजय आपल्या नावावर नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सचा हा विजय अनेक अर्थांनी विशेष आहे कारण गेल्या काही दिवसांपासून संघातील खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत होते. या सामन्यापूर्वी मिचेल मार्श आणि टिम सेफर्ट कोविड पॉझिटिव्ह आढळून आले होते. एका क्षणी असे वाटू लागले की हा सामना खेळला जाईल की नाही? गेल्या चार-पाच दिवसांपासून दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू सतत कोविड चाचण्या करत होते तसेच काही जण आयसोलेशनमध्ये होते, त्यामुळे हा संघ प्रशिक्षणाशिवाय या सामन्यात खेळायला गेला होता. (DC vs PBKS David Warners video goes viral)

सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूमचे डेव्हिड वॉर्नरने जे वातावरण केले होते ते अप्रतिम होते. सामना संपल्यानंतर वॉर्नरने ड्रेसिंग रूममध्ये आपले बॉलिवूड प्रेम दाखवले आणि सर्वांना ओरडून विचारले की जोश कसा आहे... वॉर्नरचे बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांवरील प्रेम कोणापासून लपलेले नाहीये. सामन्याच्या शेवटी, जिथे त्याने 'पुष्पा' चित्रपट 'झुकेगा नहीं...' ची सिग्नीचर स्टेप देऊन विजय साजरा केला म्हणायला हरकत नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्जला 20 षटकात 115 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने लक्ष्याचा पाठलाग 10.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात केला. वॉर्नरशिवाय पृथ्वी शॉने 20 चेंडूत 41 धावा केल्या, तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी गोलंदाजीत सामन्यादरम्यान चमकदार कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT