Dawid Malan Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: डेव्हिड मलानचा थरार, वर्ल्ड कपमध्ये ठोकले पहिले 'शतक'; बाबर आझमलाही सोडले मागे

ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 चा सातवा सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात धरमशाला येथे खेळवला जात आहे.

Manish Jadhav

ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 चा सातवा सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात धरमशाला येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लिश फलंदाज डेव्हिड मलानने शानदार फलंदाजी करत एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक आणि विश्वचषक इतिहासातील पहिले शतक पूर्ण केले. 100 चेंडूत त्याने 127 धावा केल्या.

मलानचा खास विक्रम

दरम्यान, धरमशालामध्ये झालेल्या या शतकासह मलानच्या नावावर एक खास विक्रमही नोंदवला गेला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात कमी डावात सहा शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

त्याच्या आधी हा खास विक्रम पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकच्या नावावर होता. त्याने 27 डावात सहा वनडे शतके झळकावली होती. तर मलानने अवघ्या 23 डावात ही खास कामगिरी केली आहे.

मलाननेही बाबरला मागे सोडले

मलानने खास विक्रमांच्या बाबतीत केवळ इमाम-उल-हकच नाही तर पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमसह (Babar Azam) अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. बाबरला वनडे फॉरमॅटमध्ये सहा शतके पूर्ण करण्यासाठी 32 डावांचा सामना करावा लागला होता. त्याच्याशिवाय उपुल थरंगाने 29 डावांत आणि हाशिम आमलाने 34 डावांत हा खास विक्रम केला होता.

एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद सहा शतके करणारा फलंदाज:

डेविड मलान – इंग्लंड – 23 डाव

इमाम उल हक – पाकिस्तान – 27 डाव

उपुल थरंगा – श्रीलंका – 29 डाव

बाबर आझम – पाकिस्तान (Pakistan) – 32 डाव

हाशिम आमला – दक्षिण आफ्रिका – 34 डाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT