India vs Pakistan | Davis Cup | Tennis PTI
क्रीडा

David Cup: 60 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टेनिस संघाचे निर्विवाद वर्चस्व, 3-0 ने मिळवला विजय

Pranali Kodre

Davis Cup, India vs Pakistan:

टेनिसचा वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेविस कपच्या वर्ल्ड ग्रुप 1 प्लेऑफमध्ये भारताची लढाई पाकिस्तानविरुद्ध होती. त्यासाठी तब्बल 60 वर्षांनी भारतीय टेनिस संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने निर्विवाद वर्चस्व ठेवताना 3-0 असा विजय मिळवला आणि वर्ल्ड ग्रुप-1 मध्ये प्रवेश केला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारताने पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी (3 फेब्रुवारी) दोन्ही एकेरीचे सामने जिंकले होते.

त्यानंतर रविवारी (4 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशी भारताच्या युकी भांबरी आणि साकेत मायनेनी यांनी पाकिस्तानच्या मुझामिल मुर्तझा आणि बरकत उल्लाह या जोडीला दुहेरीत 6-2, 7-6 (7-5) अशा फरकाने दोन सेटमध्ये पराभूत केले.

त्यामुळे भारताला 3-0 अशी आघाडी मिळाल्याने विजय निश्चित झाला. त्याचमुळे नंतरचे दोन एकेरी सामने खेळवण्यात आले नाही.

रविवारी झालेल्या दुहेरीच्या सामन्यात भांबरी आणि साकेत यांनी पहिल्याच सेटमध्ये सोपा विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्यांना मुर्तझा आणि बरकत या जोडीने तगडे आव्हान दिले. हा सेट 6-6 असा बरोबरीत सुटल्याने टायब्रेकर घेण्यात आला.

टायब्रेकरमध्ये भांबरी आणि साकेत यांनी 7-5 असा विजय मिळवत सामनाही जिंकला. तसेच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, पहिल्या दिवशी शनिवारी भारताच्या रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी यांनी एकेरीचे सामने जिंकले होते.

रामकुमार रामनाथनने पाकिस्तानच्या 43 वर्षीय ऐसम-उल-हक कुरेशीला 6-7 (3), 7-6 (4), 6-0 अशा तीन सेटमध्ये पराभूत केले होते. तसेच बालाजीने अकिल खानला 7-5, 6-3 असे दोन सेटमध्ये पराभूत केले होते.

आता भारताने वर्ल्ड ग्रुप 1 फेरीत भारताने प्रवेश केला आहे. ही फेरी सप्टेंबर 2024 ला होईल. दरम्यान, पाकिस्तान पराभूत झाल्याने त्यांना वर्ल्ड ग्रुप-2 मध्ये खेळावे लागणार आहे.

दरम्यान, भारताने डेविस कपमध्ये पाकिस्तानला पराभूत करण्याची ही आठवी वेळ आहे. आत्तापर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध कधीही डेविस कपमध्ये पराभव स्विकारलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT