Davis Cup: भारताचे पहिल्या दिवशी पाकिस्तानवर वर्चस्व; रामकुमार, बालाजीच्या विजयाने मिळवून दिली 2-0 आघाडी

India vs Pakistan, Davis Cup: डेविस कप स्पर्धेसाठी 60 वर्षांनी पाकिस्तान दौरा केलेल्या भारतीय टेनिस संघाने पहिल्या दिवशी 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
Ramkumar Ramanathan and N Sriram Balaji | Davis Cup
Ramkumar Ramanathan and N Sriram Balaji | Davis Cup
Published on
Updated on

India Take 2-0 Lead against Pakistan, Davis Cup Day 1:

टेनिसचा वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेविस कप स्पर्धेतील सामन्यांसाठी भारतीय संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. भारत आणि पाकिस्तान हे टेनिस संघ वर्ल्ड ग्रुप 1 प्लेऑफमधील सामन्यांसाठी आमने-सामने आहेत.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेविस कपचे सामने शनिवार आणि रविवारी (3 आणि 4 फेब्रुवारी) खेळवले जात आहेत. दरम्यान, पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

विशेष म्हणजे भारतीय टेनिस संघ 1964 नंतर म्हणजे तब्बल 60 वर्षांनंतर डेविस कपसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. डेविस कपमध्ये भारताने कधीही पाकिस्तानविरुद्ध पराभव स्विकारलेला नाही.

Ramkumar Ramanathan and N Sriram Balaji | Davis Cup
Australian Open: 22 वर्षीय सिन्नरचं विजेतेपद जिंकून देणारं कमबॅक! ऑस्ट्रेलियन ओपनला मिळाला नवा विजेता

या स्पर्धेत पहिल्या दिवशी दोन एकेरीचा सामने खेळवण्यात आले. यातील पहिल्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या रामकुमार रामनाथनने पाकिस्तानच्या 43 वर्षीय ऐसम-उल-हक कुरेशीला 6-7 (3), 7-6 (4), 6-0 अशा तीन सेटमध्ये पराभूत केले.

कुरेशीने रामकुमारला पहिल्या दोन्ही सेटमध्ये कडवी झुंज दिली होती. त्याने पहिला सेटही टायब्रेकरमध्ये जिंकला. तसेच दुसऱ्या सेटमध्येही बरोबरी साधत टायब्रेकरमध्ये नेला होता. मात्र दुसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये रामकुमारने बाजी मारली आणि सामन्यात बरोबरी साधली.

तिसऱ्या सेटमध्ये मात्र रामकुमारने कुरेशीला कोणतीच संधी दिली नाही. त्याने बिनतोड सर्व्हिस करण्याबरोबरच कुरेशीची सर्व्हिस तोडण्यातही यश मिळवले. त्यामुळे हा सामना रामकुमारने जिंकत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती.

Ramkumar Ramanathan and N Sriram Balaji | Davis Cup
Davis Cup: तब्बल 60 वर्षांनी भारतीय टेनिस टीम करणारा पाकिस्तानचा दौरा, 'हा' खेळाडू करणार नेतृत्व

त्यानंतर पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात एन श्रीराम बालाजीने अकिल खानला 7-5, 6-3 असे दोन सेटमध्ये पराभूत केले. त्याला पहिल्या सेटमध्ये अकिलने चांगली लढत दिली होती. 4-4 असा सामना बरोबरीत देखील होता.

मात्र दुहेरीचा स्पेशालिस्ट असलेल्या बालाजीने पहिला सेट जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र अकिलला त्याने फार वरचढ होऊ दिले नाही आणि सहज विजय मिळवत सामनाही जिंकला. यामुळे पहिल्या दिवसाखेर भारताला 2-0 अशी आघाडी मिळाली.

आता दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आधी युकी भांबरी आणि साकेत मायनेनी ही भारतीय जोडी पाकिस्तानच्या मुझामिल मुर्तझा आणि बरकत उल्लाह या जोडीला दुहेरीत भिडणार आहे.

या दुहेरीच्या सामन्यानंतर अकिल खान आणि रामकुमार रामनाथन यांच्या एकेरीचा सामना होईल, तसेच त्यानंततर ऐसम-उल-हक-कुरेशी आणि एन श्रीराम बालाजी यांच्यात एकेरीचा सामना होईल.

दरम्यान या प्लेऑफमधील विजेता संघ वर्ल्ड ग्रुप 1 च्या फेरीत प्रवेश करेल. ही फेरी सप्टेंबर 2024 ला होईल. तसेच पराभूत संघाला परत वर्ल्ड ग्रुप 2 मध्ये खेळावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com