England Team  DainIk Gomantak
क्रीडा

World Cup 2023 दरम्यान इंग्लंडच्या स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, 'मी अभिमानाने...'

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम पाहायला मिळत असतानाच इंग्लंड क्रिकेट संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम पाहायला मिळत असतानाच इंग्लंड क्रिकेट संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने विश्वचषक 2023 हंगामाच्या मध्यातच निवृत्तीची घोषणा केली आहे.

इंग्लिश गोलंदाजाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. पोस्ट करताना विलीने लिहिले की, 'आयुष्यात हा दिवस यावा असे मला कधीच वाटले नाही. इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्याचे माझे लहानपणापासून स्वप्न होते.

खूप विचार केल्यानंतर मी ठरवले की, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेणार नाही.

विली पुढे म्हणाला, 'मी अभिमानाने इंग्लंडची (England) जर्सी घातली होती. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह एका महान संघाचा भाग झाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. यादरम्यान मी खूप चांगले मित्र बनवले. याकाळात माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मी माझ्या कुटुंबाचे मनापासून आभार मानतो. या प्रवासात त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला.'

डेव्हिड विलीची क्रिकेट कारकीर्द:

डेव्हिड विलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत इंग्लंड क्रिकेट (Cricket) संघासाठी एकूण 113 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याला 112 डावात 145 विकेट्स घेतल्या आहे. विलीने 70 एकदिवसीय सामन्यांच्या 69 डावांमध्ये 30.34 च्या सरासरीने 94 विकेट्स आणि 43 टी20 सामन्यांच्या 43 डावांमध्ये 23.14 च्या सरासरीने 51 बळी घेतले आहेत.

फलंदाजी करताना, त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 43 डावांमध्ये 26.12 च्या सरासरीने 627 धावा आणि टी20 च्या 26 डावांमध्ये 15.07 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT