David Warner and Bhuvneshwar Kumar Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: अन् वॉर्नरने थेट भूवीचे पायच धरले! जुन्या मित्रांच्या Video ने जिंकली लाखो मनं

डेव्हिड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार यांच्यातील एका मैत्रीच्या व्हिडिओने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Pranali Kodre

David Warner touches Bhuvneshwar Kumar feet: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 7 धावांनी विजय मिळवला. या अटीतटीच्या सामन्यानंतर मात्र डेव्हिड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार यांच्यातील एका मैत्रीच्या व्हिडिओने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

खरंतर वॉर्नर दिल्लीचा कर्णधार आहे, तसेच भुवनेश्वर कुमार हैदराबाद संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पण हे दोघेही अनेकवर्षे हैदराबादकडून एकत्र खेळले होते. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यांची ही मैत्री सोमवारी झालेल्या सामन्यादरम्यानही दिसून आली. त्यांचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरही शेअर करण्यात आला.

या व्हिडिओत दिसते की या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी वॉर्नर आणि भुवनेश्वर भेटले होते. या वेळी वॉर्नर पळत भुवीजवळ गेला आणि थेट त्याच्या पाया पडला. त्यानंतर त्यांनी एकमेकांची घट्ट गळाभेट घेतली. यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या इशांत शर्माला त्याचे हसू आवरता आले नाही. त्याच्या या मैत्रीच्या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 144 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून मनिष पांडेने 34 आणि अक्षर पटेलने 34 धावांची खेळी केली.

या दोघांव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारनेही चांगली गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 11 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर टी नटराजन याने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे हैदराबादला 20 षटकात 6 बाद 137 धावांच करता आल्या. हैदराबादकडून मयंक अगरवालने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तसेच हेन्रिक क्लासेनने 31 धावांची खेळी केली.

दिल्लीकडून एन्रिक नॉर्किया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT