Danish Kaneria on CAA Rule Dainik Gomantak
क्रीडा

CAA Act News: पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेतील...धन्यवाद मोदीजी! CAA लागू झाल्यानंतर दानिश कनेरियाची प्रतिक्रिया

Danish Kaneria on CAA Rule: 43 वर्षीय कनेरियाने लिहिले की, "नागरिकत्व दुरुस्ती कायदा अधिसूचित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार."

Manish Jadhav

Danish Kaneria Expressed Happiness On CAA:

देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी CAA बाबत अधिसूचना जारी केली. हा कायदा 2019 मध्ये संसदेने मंजूर केला होता. याअंतर्गत तीन मुस्लिम शेजारी देशांतील (पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान) अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागेल. CAA लागू झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, शेजारी देश पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियानेही CAA बाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने 'X' वर दोन पोस्ट शेअर केल्या. त्याने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले की, “पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील.” त्यानंतर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. 43 वर्षीय कनेरियाने लिहिले की, "नागरिकत्व दुरुस्ती कायदा अधिसूचित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार." यापूर्वी, कनेरिया यांनी अनेकवेळा सांगितले आहे की हिंदू असल्याने त्याला पाकिस्तानमध्ये खूप संघर्ष करावा लागला आहे.

दुसरीकडे, कनेरियाने 2000 ते 2010 दरम्यान पाकिस्तानसाठी 61 कसोटी आणि 18 एकदिवसीय सामने खेळले. पाकिस्तान क्रिकेटमध्ये तो खूप लोकप्रिय होता. तो कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक बळी घेणारा फिरकी गोलंदाज आहे. त्याने एकूण 261 मारले. 2012 मध्ये फिक्सिंग प्रकरणात कनेरियाचे नाव आले होते, त्यानंतर त्याची कारकीर्द उद्ध्वस्त झाली होती. कनेरिया हा पाकिस्तानचा (Pakistan) माजी यष्टिरक्षक अनिल दलपतचा चुलत भाऊ आहे. अनिलने 1984 ते 1986 पर्यंत 9 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. अनिल हा पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला हिंदू क्रिकेटर होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

SCROLL FOR NEXT