Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: विराट कोहली पुन्हा RCB चा कर्णधार होणार?

विराट कोहली (Virat Kohli) सध्या कोणत्याही संघाचा कर्णधार नाही. 2013 मध्ये, तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार बनला होता.

दैनिक गोमन्तक

विराट कोहली सध्या कोणत्याही संघाचा कर्णधार नाही. 2013 मध्ये, तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार बनला होता. यानंतर तो भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झाला. पुढे तो तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनला. परंतु गेल्या वर्षी त्याने टी-20 मधील टीम इंडियाचे (Team India) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याने आरसीबीच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. निवड समितीने विराटला (Virat Kohli) भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुनही काढून टाकले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने या फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडले. (Daniel Vettori has said that Virat Kohli will not be the RCB captain again)

दरम्यान, आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतर संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. आयपीएल-2022 मेगा लिलावापूर्वी, संघाने काही पर्याय देखील दिले होते, जे ते पुढील कर्णधार म्हणून पाहत होते. आता संघाचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीने (Daniel Vettori) याबाबत आपले मत मांडले आहे.

विराट कर्णधार करणार नाही - व्हिटोरी

ईएसपीएनक्रिकइन्फो या वेबसाइटशी बोलताना व्हिटोरी म्हणाला की, आरसीबी विराटला पुन्हा कर्णधार बनवणार नाही. तो पुढे म्हणाला, विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कर्णधार होणार नाही. मला वाटते की हे खूप सोपे आहे. विराट कर्णधार म्हणून काम करेल असं मला वाटत नाही. एकदा कर्णधारपद सोडून दिल्यानंतर त्याच्यापुढे जाणे चांगले."

हे खेळाडू नेतृत्व गटाचा भाग असतील

चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) यशात महत्त्वाची भूमिका बजावणारा फलंदाज फाफ डू प्लेसिसचा आरसीबीने समावेश केला आहे. याशिवाय त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकलाही संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे हे दोघेही कर्णधारपदाचे पर्याय असू शकतात. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलही संघासोबत आहे. हे सर्वजण कोहलीसह संघाच्या नेतृत्व गटाचा भाग असतील, असे व्हिटोरीने म्हटले आहे.

व्हिटोरी पुढे म्हणाला, “मला वाटते की, नेतृत्व गटात कोहली, मॅक्सवेल आणि डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिकलाही ठेवण्यात आले आहे. मला फॅफ मॅक्सवेलची जागा घेईल. जर त्याने पहिले तीन सामने जिंकले तर त्याला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात येईल.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT