PV Sindhu Dainik Gomantak
क्रीडा

CWG 2022: PV Sindhu ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 'सुवर्ण' कामगिरी

PV Sindhu Wins Gold: भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या शेवटच्या दिवशी सुवर्णपदक जिंकले.

दैनिक गोमन्तक

PV Sindhu Gold Medal Women's Singles Badminton CWG 2022: भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या शेवटच्या दिवशी सुवर्णपदक जिंकले. तिने बॅडमिंटन महिला एकेरीच्या सामन्यात कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. याआधी उपांत्य फेरीच्या सामन्यातही सिंधूने चमकदार कामगिरी केली होती. तीच कामगिरी कायम ठेवत तिने सुवर्ण जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारतासाठी हे 19 वे सुवर्णपदक आहे.

दरम्यान, सिंधूने अंतिम सामन्यात कॅनडाची (Canada) शटलर मिशेल ली हिचा 2-0 असा पराभव केला. या विजयासह तिने सुवर्णपदक पटकावले. सिंधूने फायनलच्या पहिल्या गेमपासूनच आघाडी घेतली होती. तिने शानदार सुरुवात करत पहिला गेम 21-15 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्येही ती बरोबरीत होती. दुसरीकडे, मिशेलनेही आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही. सिंधूने दुसरा गेमही जिंकला. शेवटी तिने 21-13 असा विजय मिळवला.

विशेष म्हणजे, बॅडमिंटनमधील (Badminton) भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. टीम इंडिया (Team India) आता 19 सुवर्णपदकांसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. सुवर्णाबरोबरच भारताने 15 रौप्य आणि 22 कांस्यपदकेही जिंकली आहेत. आता भारताच्या (India) खात्यात एकूण 56 पदके आहेत. या बाबतीत कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडाची 26 सुवर्णपदके आहेत. तर ऑस्ट्रेलिया 66 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

SCROLL FOR NEXT