PV Sindhu  Dainik Gomantak
क्रीडा

CWG 2022: बॅडमिंटनमध्ये भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, PV Sindhu चा दबदबा

Indian Badminton Players: भारतीय बॅडमिंटनपटूंनी शुक्रवारी 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सांघिक सामन्यात पाकिस्तानचा 5-0 ने धुव्वा उडवला.

दैनिक गोमन्तक

CWG 2022: भारतीय बॅडमिंटनपटूंनी शुक्रवारी 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सांघिक सामन्यात पाकिस्तानचा 5-0 ने धुव्वा उडवला. बी सुमीथ रेड्डी आणि मचिमंदा पोनप्पा या जोडीने मिश्र दुहेरीच्या सामन्यात मुहम्मद इरफान सईद भाटी आणि गझला सिद्दीकी यांच्यावर 21-9, 21-12 असा एकतर्फी विजय मिळवून या गेम्समध्ये त्यांच्या संघाच्या प्रवासाला सुरुवात केली. किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीच्या लढतीत मुराद अलीवर 21-7, 21-12 ने सहज विजय मिळवला.

दरम्यान, महिला एकेरीच्या सामन्यातही भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम राहिले. जिथे दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला (PV Sindhu) महिला एकेरीच्या सामन्यात माहूर शहजादला पराभूत करण्यात कोणतीही अडचण आली नाही. सिंधूने 21-7, 21-6 असा शानदार विजय नोंदवला.

तसेच, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुढचा सामना 21-12 आणि 21-9 असा जिंकला, तर शेवटच्या सामन्यात ट्रेसा आणि गायत्री जोडीने 21-4, 21-5 असा विजय मिळवून पाकिस्तानचा (Pakistan) धुव्वा उडवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT