नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. ना त्याची बॅट धावत आहे, ना त्याचे दिवस. खराब फॉर्ममुळे त्याला आधी टीम इंडियातून वगळण्यात आले आणि आता त्याची दोन घड्याळे कस्टम विभागाने (Customs department) विमानतळावर (Airport) जप्त केली आहेत. त्याच्या या घड्याळांची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. खरंतर हार्दिक पंड्या टीम इंडियासोबत टी-20 वर्ल्ड कप 2021 साठी UAE मध्ये होता. Customs department seizes Rs 5 crore watch of Hardik Pandya
एएनआयच्या म्हणण्यानुसार, तो टीमसोबत घरी परतल्यावर सीमाशुल्क विभागाने त्याला थांबवले आणि त्याची महागडी घड्याळे जप्त केली. भारतीय अष्टपैलू खेळाडूने या घड्याळांना कस्टम वस्तू म्हणून घोषित केले नव्हते किंवा त्याच्याकडे कोणाचे बिलही नव्हते.
पांड्याकडे या महागड्या ब्रॅन्डची घडाळे
भारताचा अष्टपैलू खेळाडू पांड्याला घड्याळांची कीती चिंता आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याच्याकडे Patek Philippe Nautilus Platinum 5711 यासह दुर्मिळ आणि महागड्या ब्रँडच्या घड्याळांचा संग्रह आहे. गेल्या वर्षी हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्याही महागड्या घड्याळ प्रकरणात अडकला होता. त्यानेही सीमाशुल्क विभागाला माहिती दिली नव्हती आणि त्यानंतर त्याची घड्याळे जप्त करण्यात आली.
T20 विश्वचषक 2021 हार्दिक पांड्यासाठी काही खास नव्हता. त्याला संघात आपली योग्यता सिद्ध करता आली नाही. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या घरच्या मालिकेसाठी त्याला संघातून वगळण्यात आले. विश्वचषकात पंड्याला 5 सामन्यांच्या 3 डावात केवळ 69 धावा करता आल्या होत्या. आता न्यूझीलंडविरुद्ध पांड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.