MS Dhoni & KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 च्या वेळापत्रकात बदल, LSG vs CSK सामन्यापूर्वी घेतला मोठा निर्णय

LSG vs CSK IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये चाहत्यांना एकापेक्षा एक चित्तथरारक सामने पाहायला मिळत आहेत.

Manish Jadhav

LSG vs CSK IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये चाहत्यांना एकापेक्षा एक चित्तथरारक सामने पाहायला मिळत आहेत. पण या सगळ्यामध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

आयपीएल 2023 मध्ये, 4 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार होता.

IPL 2023 च्या वेळापत्रकात मोठा बदल

आयपीएल 2023 चा 46 वा लीग सामना यजमान लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जाईल.

उभय संघांमधील हा सामना 4 मे रोजी दुपारी 3.30 वाजल्यापासून होणार होता. पण त्याच दिवशी लखनऊमध्ये नागरी संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

अशा परिस्थितीत हा सामना आता चार ऐवजी 3 मे रोजी होणार आहे. अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नाही, परंतु बीसीसीआयने अनौपचारिकपणे संघांना सांगितले आहे की, हा सामना एक दिवस आधी होणार आहे.

हे मोठे अपडेट समोर आले

बोर्डातील एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "लखनऊ नगरपालिकेच्या निवडणुका 4 मे रोजी होणार आहेत, त्यामुळे सुरक्षेबाबत समस्या उद्भवू शकतात." लखनऊ सुपर जायंट्स आणि CSK यांच्यातील सामना साडेतीन वाजता आहे.

आता हा सामना 3 मे रोजी त्याचवेळी होणार आहे. प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी कमी होऊ नये म्हणून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

CSK संघ

एमएस धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, दीपक चहर, मोईन अली, शिवम दुबे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, सिसांडा मगला, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, मुकेश चॉवरी, मुकेश पट्टिका , प्रशांत सोलंकी , महेश थिक्शाना , अजिंक्य रहाणे , शेख रशीद , सुभ्रांशु सेनापती , निशांत सिंधू , अजय मंडल , भगत वर्मा , सिमरनजीत सिंग.

LSG संघ

केएल राहुल, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, मोहसीन खान, मनन वोहरा, मयंक यादव, आवेश खान, यश ठाकूर, मार्कस स्टॉइनिस, डॅनियल सॅम्स, काइल मेयर्स, दीपक हुडा, करण शर्मा, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, के गौतम, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, रोमॅरियो शेफर्ड, अमित मिश्रा, नवीन-उल-हक, युधवीर चरक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Gangwar: मुंगूल-मडगाव गँगवॉरचे बिश्नोई गँगशी कनेक्शन; कुख्यात गुंड 'ओमसा'ला राजस्थानमधून अटक

Viral Video: “मी मन पाहून प्रेम करते!” म्हणणाऱ्या मुलीला पठ्ठ्याचं जबरदस्त उत्तर, व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक; म्हणाले...

Vishwajit Rane Meet Fadanvis: मंत्री विश्वजीत राणेंनी मुंबईत घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Chess World Cup 2025: '...अन् तो डिस्कोत मनसोक्त नाचला', 23 वर्षांनी गोव्यात बुद्धीबळ विश्वचषक; आयोजकांनी सांगितला इराणी खेळाडूचा 'तो' किस्सा

Viral Video: उंदीर मामाने पळवला गणपती बाप्पाचा मोदक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; फोंड्यातील मजेशीर घटनेने वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT